लोकपंचायत तंत्रशिक्षण संस्थेच्या उपकरणास केंद्र शासनाचे पेटंट!

संगमनेर

लोकपंचायत ग्रामीण तंत्रशिक्षण संस्थेचे गट निदेशक बाळासाहेब हासे यांनी तयार केलेल्या स्टील चॅनेल व्हाईस या उपकरणाला नुकतेच केंद्र सरकारचे पेटंट मिळाले. आयटीआय मधील विदयार्थ्यांना जॉबवर वेगवेगळ कामे करताना जॉबला आवश्यक स्थितीत मजबूत पकडून ठेवण्यासाठी या उपकरणाची मदत होते.

बॅच व्हाईस हे प्रामुख्याने कास्टिंगचे बनवलेले असतात. परंतु सदर पेटंट मिळालेला व्हाईस हा स्टील चॅनेलपासून बनविलेला आहे. कास्टिंग व्हाईसची बाजारातील मूळ किंमत खूप जास्त असते. अनेक प्रकारच्या व्हाईसचा अभ्यास केला असता असे लक्षात आले की, कास्टिंग व्हाईस बनविण्यासाठी लागणारा खर्च तुलनेने जास्त असणार आहे. त्यामुळे हासे यांनी कल्पकता वापरून स्टील चॅनेलपासून स्वतःच व्हाईस बनवण्याचे ठरवले. सुरुवातीला हासे यांनी सी.एन.सी मशिनचा वापर करून चॅनेलपासून एक डेमो व्हाईस बनविला. त्यानंतर त्या व्हाईसची अल्टीमेट टेन्साईल स्ट्रेन्थ मशीनवर टेस्टिंग करण्यात आली.

त्यावेळी त्यांच्या असे निदर्शनास आले की, बनविलेला व्हाईस हा अतिशय स्ट्रेन्थ असलेला आहे. या व्हाईसवर जास्तीतजास्त दाब अथवा ताण दिला तरी तो तुटणार नाही. त्यानंतर असे आठ व्हाईस बनवण्यात आले. अशा प्रकारचा व्हाईस मार्केटमध्ये आहे की नाही याची खात्री करून घेतली असता तसा कुठेही आढळून आला नाही. त्यामुळे हासे यांनी व्हाईस डिझाईनचे पेटंट करण्याचे ठरवले. पेटंट रेजिस्ट्रेशन आणि प्रोसेस करण्यासाठी एक वर्ष लागले सदर पेटंट भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून नुकतेच प्रकाशित झाले आहे.

पेटंट कामामध्ये त्यांना प्राचार्य प्रशांत सहाणे, निदेशक विकास गुंजाळ यांचे सहकार्य लाभले. लोकपंचायत ग्रामीण तंत्रशिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सारंग पांडे, अध्यक्ष विजय थोरात, उपाध्यक्ष प्रा. तुळशीराम जाधव, खजिनदार सिताराम राऊत आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

--------


टिप्पण्या