पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संगमनेर तालुका सह. दुध संघाच्या चेअरमनपदी रणजीतसिंह देशमुख तर व्हा. चेअरमन पदी राजेंद्र चकोर यांची बिनविरोध निवड

इमेज
  संगमनेर  काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते व राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अग्रमानांकित असणाऱ्या संगमनेर तालुका सहकारी दुध उत्पादक संघाची 2022 - 2027 या पंचवार्षिक करीता  बिनविरोध निवडणूक पार पडली असून आज चेअरमनपदी रणजितसिंह देशमुख यांची फेरनिवड तर व्हा चेअरमन पदी राजेंद्र चकोर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. संगमनेर तालुका सहकारी दुध संघाच्या अतिथी गृहामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी उपनिबंधक गणेश पुरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड एक मताने करण्यात आली.  यावेळी  महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव पा. खेमनर, इंद्रजीत भाऊ थोरात, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, यांच्या उपस्थितीत ही निवड झाली .रणजितसिंह देशमुख यांच्या नावाची सूचना लक्ष्मणराव कुटे यांनी मांडली तर विलास कवडे यांनी अनुमोदन दिले .आणि व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर यांच्या नावाची सूचना संतोष मांडेकर यांनी मांडली तर भास्करराव सिनारे यांनी अनुमोदन दिले .यावेळी नवनिर्वाचित संचालक लक्ष्मणराव कुटे, आर. बी .रहाणे...

संगमनेरात आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात वाढ

इमेज
अनंत पांगारकर संगमनेर :  गेल्या काही दिवसात संगमनेरात आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यासाठी संबंधितांकडून पोलीस यंत्रणेचा वापर केला जातो. राजकीय पक्षाशी बांधिलकी सांगणाऱ्या लोकांच्या माध्यमातून संबंधितांना कायदेशीर कारवाईत अडकविण्याची भीती दाखवत आर्थिक लुटीचे हे प्रकार सुरू असल्याचे दिसते. गेल्या काही वर्षात संगमनेरमध्ये जमीन खरेदी-विक्रीचे प्रकार मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. यातून अनेक एजंट, मध्यस्थ, दलाल यांची साखळी कार्यरत आहे. यातून अनेकदा वाद-विवादाचे देखील प्रसंग उद्भवले आहे. बऱ्याचदा हे वाद पोलिस ठाण्यात पोहोचतात. आपसात मिटणाऱ्या या वादाला शहरातील काही असामाजिक तत्त्वे वेगळे वळण देत ही प्रकरणे पोलिस ठाण्यात नेत असतात. जमिनीशी संलग्न वाद हे न्यायालयात सोडविण्याऐवजी त्याला फौजदारी वादाचे स्वरूप देत पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या जातात. पोलिसांना हाताशी धरून संबंधितांवर आपला राग काढण्याच्या उद्देशाने विनयभंग, जातीवाचक शिवीगाळ, मारहाण, धमकावणे अशा प्रकारचे विविध गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले जाते. बऱ्याचदा अशा प्रकरणात पोलीस...

ना. थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका सहकारी दूध संघाची निवडणूक बिनविरोध

इमेज
संगमनेर  काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते व राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका सहकारी दुध संघाची सन 2022- 2027 या पंचवार्षिक करिता संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली असून दूध संघाने आपली बिनविरोधची गौरवशाली परंपरा जपली आहे. नामदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार हा देशाला दिशादर्शक ठरला आहे . आपल्या गुणवत्तेमुळे राजहंस दूध संघ हा राज्यात पहिल्या क्रमांकाचा राहिला असून या दूध संघामुळे तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे . नामदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली व महानंदा चे अध्यक्ष व दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 2022- 27 करिता संचालक मंडळाची बिनविरोध निवडणूक झाली आहे . या नवीन संचालक मंडळात सर्वसाधारण गटातून दूध संघाचे विद्यमान चेअरमन व महानंदा चे अध्यक्ष रणजितसिंह  विजयसिंह देशमुख, लक्ष्मणराव बाळाजी कुटे, आर. बी .रहाणे, भास्करराव मारुती सिनारे, विलास हरिभाऊ वरपे ,राजेंद्र नामदेव चकोर , संतोष निवृत्ती मांडेकर ,विलास साहेबराव कवडे, बादशहा लक्ष्मण वाळुंज, विक्रम शिवाजीराव थोरात, संजय साहेबरा...

राष्ट्रसेवा दलाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी ऍड. समीर लामखडे यांची निवड

इमेज
संगमनेर : राष्ट्र सेवा दलाच्या अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीची निवडणूक शिवजयंतीच्या दिवशी नगरमध्ये रावसाहेब पटवर्धन स्मारक समितीमध्ये पार पडली. त्यात अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्षपदी संगमनेर येथील अॅड. समीर लामखडे यांची निवड करण्यात आली. तर जिल्हा संघटक म्हणून पाराजी मुसमाडे यांची निवड झाली.  निवडणूक निरिक्षक म्हणून राष्ट्रसेवा दलाचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे यांनी काम पाहिले. या निवडणुकीत दिनेश खोसे, अश्विनी येणारे, मुकेश गडधे, सुनील मते यांची राज्य मंडळ सदस्य म्हणून निवड झाली, तर प्रा. पुरुषोत्तम पगारे, ऍड रवींद्र शितोळे, लक्ष्मण जेवे, रामदास भोजने, हनुमंत सुद्रिक, भाऊसाहेब माळवदे, हेमराज जावळे, कैलास लेंभे, वसंत कर्डिले, संतोष खेडकर, सोमनाथ बोंतले, सुखदेव होन, रानोबा गोडसे, गणेश कात्रजकर, काजल आसणे यांची सदस्य म्हणून निवड झाली.  त्रैवार्षिक निवडणुकीच्या या बैठकीसाठी जिल्ह्यातील सुमारे 250 पेक्षा जास्त सेवा दल सैनिक उपस्थित होते. भारतीय संविधान आणि धर्मनिरपेक्षता यांच्या बळकटीसाठी राष्ट्रसेवा दल कटिबद्ध आहे. संविधानाचा विचार प्रत्येक भारतीयाच्या मनात रु...

प्रशासकीय काळातही स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान वेगात, शहरातील भिंती देऊ लागल्या स्वच्छतेचे संदेश

इमेज
             नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनीं प्रथमत: नगराध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली आणि स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर, हरित संगमनेरचा नारा देत त्यादृष्टीने आपल्या कामाची दिशा स्पष्ट केली. त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळातच शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानाची जोड त्याला मिळाली. दुग्धशर्करा योग जुळून आला आणि नगराध्यक्ष तांबे यांच्यासह तत्कालिन पालिका प्रशासनाने तत्कालिन मुख्याधिकारी सचिन बांगर यांच्या नेतृत्वाखाली मोठी मेहनत घेतली. संगमनेरकरांची या अभियानाला साथ मिळाली आणि कोट्यावधी रुपयांची बक्षिसे पालिकेच्या खात्यावर जमा झाली.            स्वच्छ व हरीत शहराचा ध्यास घेतलेल्या नगराध्यक्ष तांबे यांनी घरोघरी जात संगमनेरकरांचे प्रबोधन करत ओला व सुका कचरा वर्गीकरण, स्वच्छतेचे महत्व यावर भर दिला. कालांतराने ताई जेथे जात तेथे आला ओला कचरा सुका कचरा असे गमतीने म्हटले जाई. शहर स्वच्छता व हरीत संगमनेरसाठी नगराध्यक्ष दुर्गाताईंनी मोठी मेहनत घेतली. आता पालिकेतील त्यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल संपुष्...

काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देणारे संकटमोचक नामदार बाळासाहेब थोरात

इमेज
                शेक्सपीअर म्हणतो नावात काय आहे ?   पण मी म्हणतो की ,  उभं आयुष्य जनतेसाठी ,   मतदार संघाच्याही बाहेर संपूर्ण राज्यासाठी खर्ची करणाऱ्याच्या नावातच  विजय आहे.  सहकार क्षेत्रातील विख्यात अश्या सहकारमहर्षी भाऊसाहेब  ( दादा )  थोरात यांचा वारसा घेऊन सार्वजनिक जीवनात लोकांसाठी खर्ची होणं आणि सर्वांगीण विकासाचा वसा हाती घेऊनच सर्वसमावेशक प्रकारे राजकारण करणं ही आमचे प्रेरणास्थान आणि संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते महसूलमंत्री नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब यांची खासियत.                देशासह राज्यात लोकशाहीविघातक आणि  बड्या  व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधलेल्या पक्षाची सत्ता आल्यानंतर सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेस पक्षातील अनेक मोठे नेते पक्ष सोडून जात असतांना  राज्यात कॉग्रेससाठी कठीण काळ निर्माण झाला होता. कॉग्रेसची अवस्था बिकट स्थितीत असतांना  नामदार साहेबांना पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले. मूलतः संयमी आणि मितभाषी अ...

कर्तुत्ववान समाजकारणी

इमेज
कर्तुत्ववान समाजकारणी महाराष्ट्राला कृतिशील विचारवंतांचा मोठा वारसा लाभला आहे. या विचारवंतांच्या विचारावरच आज समृद्ध महाराष्ट्राचा पाया भक्कमपणे उभा आहे. या विचारवंतांच्या यादितील एक सुवर्णपान म्हणजे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात. संगमनेरकरांचे हे नेतृत्व आज केवळ राज्यातच नव्हे तर देशपातळीवर देखील यशाची शिखरे पादाक्रांत करत आहे. राजकारणाच्या माध्यमातून समाजाला दिशा दाखविणाऱ्या आणि समाज विकासाचा ध्यास घेतलेल्या कर्तुत्ववान समाजकारणी बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने... पुरातन संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या जोर्वे गावात जन्मलेल्या, संगमनेर शहरातील सर डी. एम. पेटिट हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेत, संगमनेर महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत थेट पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात कायद्याचा अभ्यास करत असतानाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सभा घेत पाणीप्रश्‍न, परीक्षा फी माफी आदींवर आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवणारा हा तरुण पुढे भविष्यात थेट राज्याच्या 'राजकारणात दीर्घ परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षातील प्रमुख नेतृत्व म्हणून पुढे येईल', अशी भविष्यवाणी...

एक विकासपर्व नामदार बाळासाहेब थोरात..!

इमेज
  एक विकासपर्व नामदार बाळासाहेब थोरात..!   कदाचित आजच्या तरुण पिढीला पूर्वीचे संगमनेर आठवत नसेल. मात्र आज दिसतो तसा हा तालुका पूर्वी विकसित नव्हता. दुष्काळी भाग असल्याने शेतकरी हलाखीचे जीवन जगत होते ,  औद्योगिक विकास नव्हता ,  कामासाठी तालुक्याबाहेर मोठ्या शहरात जावं लागायचं. पाठोपाठ रोजीरोटीची ,  मुलाबाळांच्या शिक्षणाची ,  आरोग्याची आणि शेतीचीही चिंता सर्वांना भेडसावत असे!   अशा अवस्थेतील संगमनेरला घडविण्याचा निर्धार बाळासाहेब थोरात यांनी केला आणि संगमनेरचा सर्वांगीण विकास आपल्या आयुष्याचं ध्येय बनवून त्याच्या पूर्तीसाठी ते अविरत झटले. या त्यांच्या संघर्षाचे सर्व संगमनेरकर विशेषतः ज्येष्ठ लोक साक्षीदार राहिले आहेत. हा प्रवास सोपा नव्हता मात्र त्यांनी सर्वांना सोबत घेऊन सकारात्मक राजकारणाचा अवलंब करून आज जो विकास दिसतो तो घडविण्यात त्यांना यश आले. हे करताना त्यांनी जनसामान्यांच्या अडीअडचणी जाणून ,  त्यांच्याशी हितगुज करत प्रश्न सोडवण्यावर भर दिला. आपल्या मनमिळावू सहजस्वभावाने त्यांनी लोकांच्या मनात घर केले. लोक त्यांना आपल्या घरचा सदस्यच मानून त्य...