पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संगमनेरात गोवंश हत्या सुरुच, मांसासह चार लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी पकडला

इमेज
संगमनेर : संगमनेरमधून सुरु असलेल्या गोमांस वाहतुकीवर तालुका पोलीसांनी मंगळवारी मध्यरात्री कारवाई केली. या कारवाईत दीड लाखाच्या पिकअपसह सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे गोमांस ताब्यात घेण्यात आले आहे. कोपरगांवच्या दिशेने जाणाऱ्या या पिकअपमधून सकृतदर्शनी भुश्याची वाहतुक केली जात असल्याचे भासविले जात होते. पोलीस कारवाईमुळे गोमांस वाहतुक करणाऱ्यांचा बुरखा फाटला आहे. भुश्याच्या पांढऱ्या गोण्याखाली पोलिसांना गोवंश जनावरांची कत्तल करुन त्यांचे मांस दडवून त्याची वाहतुक केली जात असल्याचे समोर आले आहे. अनेकदा केलेल्या कारवायानंतरही संगमनेरातील कत्तलखाने सुरुच आहेत. त्यामुळे वारंवार होणाऱ्या पोलीस कारवायादेखील फार्स ठरत आहेत. आत्तापर्यतच्या शेकडो कारवायानंतरदेखील येथील कत्तलखाने बंद झालेले नाहीत. शहर पोलीस हे कत्तलखाने बंद असल्याचे वरिष्ठांना भासवत असले तरी या कत्तलखान्याचा प्रश्न मध्यंतरी ऐरणीवर आल्यावर झालेल्या आंदोलनावेळी थेट पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख आणि पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या मोठ्या आर्थिक हप्तेखोरीचे आरोप झाले होते. त्यामुळे थातुरमातुर कारवाया करत पोलीस प्रशासन येथील कत्तलखाने...

शिवजयंती उत्सव युवक समितीच्या १०३७ तरूण आणि महिलांचे रक्तदान

इमेज
संगमनेर :   शिवजयंती उत्सव युवक समितीच्या माध्यमातुन आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबीराने यावर्षीचा उच्चांक साधला आहे. रक्तदान श्रेष्ठदानाचा संदेश देणाऱ्या या शिबीरामध्ये शुक्रवारी उत्सव समितीच्या १०३७ तरुण आणि महिलांनी रक्तदान केले. उत्सव समितीच्या या शिबीरास राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट देत या उपक्रमाचे कौतुक केले. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या उत्सव समितीच्या माध्यमातुन दरवर्षी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते. यावर्षीदेखील आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज ांची जयंती २१ मार्चला साजरी होत आहे. शिवजयंती निमित्त उत्सव समितीच्या माध्यमातुन गेल्या ११ वर्षापासून विविध कार्यक्रमाचे नियोजन केले जाते. या निमित्त ा ने विविध सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात. क़ोरोनाच्या काळात गोर गरिबांना अन्नछत्र उभारून उत्सव समितीने सेवा दिली. कोल्हापुर , सांगली , सातारा भागातील पुरग्रस्त कूटुंबाना संसार ो पयोगी वस्तुचे वाटप केले. गरजू विद्यार्थिंना शैक्षणिक साहित्य वाटप केले. गत वर्षी च्या रक्तदान शिबीरामध्ये ८१२ रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपली साम...

लोकपंचायत तंत्रशिक्षण संस्थेच्या उपकरणास केंद्र शासनाचे पेटंट!

संगमनेर :  लोकपंचायत ग्रामीण तंत्रशिक्षण संस्थेचे गट निदेशक बाळासाहेब हासे यांनी तयार केलेल्या ‘ स्टील चॅनेल व्हाईस ’ या उपकरणाला नुकतेच केंद्र सरकारचे पेटंट मिळाले. आयटीआय मधील विदयार्थ्यांना जॉबवर वेगवेगळ ी कामे करताना जॉबला आवश्यक स्थितीत मजबूत पकडून ठेवण्यासाठी या उपकरणाची मदत होते. बॅच व्हाईस हे प्रामुख्याने कास्टिंगचे बनवलेले असतात. परंतु सदर पेटंट मिळालेला व्हाईस हा स्टील चॅनेलपासून बनविलेला आहे. कास्टिंग व्हाईसची बाजारातील मूळ किंमत खूप जास्त असते. अनेक प्रकारच्या व्हाईसचा अभ्यास केला असता असे लक्षात आले की , कास्टिंग व्हाईस बनविण्यासाठी लागणारा खर्च तुलनेने जास्त असणार आहे. त्यामुळे हासे यांनी कल्पकता वापरून स्टील चॅनेलपासून स्वतःच व्हाईस बनवण्याचे ठरवले. सुरुवातीला हासे यांनी सी.एन.सी मशिनचा वापर करून चॅनेलपासून एक डेमो व्हाईस बनविला. त्यानंतर त्या व्हाईसची अल्टीमेट टेन्साईल स्ट्रेन्थ मशीनवर टेस्टिंग करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या असे निदर्शनास आले की , बनविलेला व्हाईस हा अतिशय स्ट्रेन्थ असलेला आहे. या व्हाईसवर जास्तीतजास्त दाब अथवा ताण दिला तरी तो तुटणार नाही. त्...

शिवजयंतीनिमीत्त महारक्तदानाचा संकल्प, याआधी उत्सव समितीने केला होता विक्रम

इमेज
  संगमनेर :   शिवजयंती निमीत्ताने शिवजयंती उत्सव समितीने महारक्तदानाचा संकल्प केला आहे. शुक्रवारी दिवसभर चालणाऱ्या या महारक्तदान शिबीरात संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन शिवजयंती उत्सव समितीने केले आहे. संगमनेर शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. संगमनेरमधील शिवजयंती उत्सव समिती गेल्या ११ वर्षापासून सातत्याने नाविण्यपुर्ण समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजविण्यासाठी व्याख्याने व विविध स्पर्धेचे आयोजन करणे, गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे हे समितीचे दरवर्षीचे उपक्रम आहेत. वेगवेगळ्या आपत्तीच्या काळातदेखील समितीच्या माध्यमातुन कोल्हापुर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पुरग्रस्त नागरिकांना किराणा व संसारोपयोगी वस्तुचे वाटप केले आहे. वैद्यकीय मदत पुरविण्यासाठी पुढाकार घेतला. कोरोना महामारीमध्येदेखील समितीने सामाजिक बांधीलकी जोपासत गरीबांना अन्नदान, कोरोना प्रतिबंधक औषध फवारणी, घरोघरी जात आरोग्य तपासणी असे समाजहिताचे उपक्रम हाती घेतले होते. कोरोनामुळे उद्भवले...

स्व. भाऊसाहेब थोरात यांचा जीवनपट हा सेवाधर्माचा महाप्रवास - आमदार लहू कानडे

इमेज
  अमृत उद्योग समूहाच्या वतीने पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन संगमनेर मीपण हे आपणामध्ये विसर्जित करून सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी सत्तेच्या मागे न लागता जनतेची सत्ता निर्माण करणारे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा जीवनपट म्हणजे सेवाधर्म दाखवणारा महाप्रवास असल्याचे गौरवोद्गार श्रीरामपूर चे आमदार जेष्ठ साहित्यिक लहू कानडे यांनी काढले आहे . अमृत उद्योग समूहाच्यावतीने कारखाना कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या बाराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते .यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाजीराव पा. खेमनर होते तर व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कांचनताई थोरात, माधवराव कानवडे, महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, शंकरराव खेमनर, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, संपतराव डोंगरे, अमित पंडित, लक्ष्मणराव कुटे, कार्लोस साठे, नवनाथ आरगडे, उपाध्यक्ष संतोष हासे, रामदास पा. वाघ, आर. बी. राहणे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आमदार लहू कानडे म्हणाले की, स्वातंत्र्य प्राप्तीस...

धनादेश अनादरप्रकरणी आरोपीची सुटका

इमेज
  संगमनेर : साडेबारा लाख रुपयांचा न वटल्याप्रकरणी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या खटल्यात आरोपीची मुक्तता करण्यात आली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. यु. महादर यांच्या न्यायालयासमोर या खटल्याची सुनावणी सुरु होती.               आरोपी उमेश गोरे यांनी मित्राकडून घरगुती कामासाठी साडेबारा लाख रुपये हातऊसने घेतले होते. सदर रकमेच्या परतावा करण्यासाठी त्यांनी शंभर रुपयांचा मुद्रांकावर करारनामा लिहुन दिला होता. मात्र त्यांनी वेळोवेळी मागणी करुनदेखील फिर्यादीला घेतलेली रक्कम परत न करता त्यापोठी एचडीएफसी बँकेचा धनादेश दिला होता. मात्र हा धनादेश बॅकेत वटला नाही. त्यामुळे फिर्यादीने आरोपी गोरे यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता. या खटल्यामध्ये आरोपीचा व फिर्यादीचा कोणताही आर्थिक संबध नव्हता. आरोपीचा फिर्यादीच्या भावाशी आर्थिक संबध होता. त्यापोटी आरोपी गोरे यांनी फिर्यादीला कोरा व बिनसहीचा धनादेश दिला होता. फिर्यादीने सदर धनादेशाचा दुरुपयोग केला. तसेच फिर्यादीची एवढी मोठी आर्थिक रक्कम हातऊसने देण्याची ऐपत नव्हती. आ...

ना. यशोमती ठाकूर, ना. थोरात यांच्या उपस्थितीत रविवारी संगमनेरात भव्य महिला मेळावा

इमेज
आ. प्रणिती शिंदे , आ. डॉ. तांबे, डॉ जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीत महिलांचा कौतुक सोहळा संगमनेर : महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या एकविरा फाउंडेशनच्यावतीने कोरोना संकटात सेवाभावी वृत्तीने काम केलेल्या अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका व वैद्यकीय क्षेत्रातील महिला भगिनींच्या कार्यकर्तृत्वाचा कौतुक सोहळा रविवार दिनांक 13 मार्च 2022 रोजी सकाळी 10.00 वा. वसंत लॉन्स येथे राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री नामदार यशोमती ठाकूर, महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात ,आमदार प्रणिती शिंदे ,आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिली. डॉ. थोरात म्हणाल्या, एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून मागील तीन वर्षात महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. कोरोनाच्या महासंकटात अत्यंत धीरोदत्तपणे काम करणार्‍या आरोग्य विभागातील महिला भगिनी ,अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचे काम अत्यंत कौतुकास्पद राहिले आहे. या कार्यकर्तृत्वाचा सन्मान व्हावा यासाठी एकविरा फाउंडेशनच्यावतीने यासर्व महिलां...

शिवसेना शहर प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

इमेज
  संगमनेर- प्रतिनिधी                         शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी संगमनेर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा मधील मुख्यत: ई-श्रम कार्ड, बाल आधार कार्ड वाटप व मोफत बँक खाते शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा जवळपास 326 व्यक्तींनी लाभ घेतला आहे. शिवसेना हा केवळ पक्ष म्हणून मर्यादित न राहता शिवसेनेचे कार्यालये म्हणजे दिनदुबळ्या व सामान्य नागरिकांच्या हक्काचे ठिकाण आहे असे म्हंटले जाते. त्याचीच प्रचिती शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयात येते.तेथे सतत गरजू नागरिक आपल्या विविध शासकीय, खाजगी, शैक्षणिक, वैद्यकीय कामांसाठी तिथे येत असतात व त्यांचे कामे पूर्णत्वास नेण्यासाठी शहर शिवसेनेची संपूर्ण टीम कार्यरत असते. संवेदनशील असलेल्या अमर कतारी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना संपर्क कार्यालय येथे भारतीय डाक विभाग संगमनेर शाखेच्या माध्यमातून मोफत ई-श्रम कार्ड व बाल आधार कार्ड वाटप शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात असंघटित...

माझी पहिली चप्पल!

इमेज
नवीन मराठी शाळेत असताना आम्हीं बरीचशी मुले अनवाणी पायांनीच शाळेत जात असू...त्यात काही वावगं वाटत नसे कुणालाही. शाळेत जाण्याच्या अगोदर सुध्दा अनवाणीच असायचो... किंबहूना लहान मुलांसाठी चपला नसतातच असा सर्वच त्याकाळातील लहान मुलांचा समज असायचा...नवीन मराठी शाळेतही सर्व शाळेत मिळून अगदी वकील, डॉक्टर, श्रीमंत यांची एकूण फारतर दहापाच मुलं मुली चप्पल/सँडल/बुट घालून येत असत. सर्वजण त्यांच्याकडे कौतुकाने बघत असत पण ते तेवढ्या पुरतंच... आपल्या पायात चपला नाहीत याचं कुणालाही वैषम्य वाटत नसे...चौथी इयत्ता पास होऊन ' पेटिट विद्यालयात ' जाऊ लागलो तरी यात फारसा बदल झाला नव्हता... मी इयत्ता सहावीत असेल...त्यावेळी आमचा इयत्ता ६ वीचा दुपारचा वर्ग वरच्या मजल्यावर होता...वर्ग खोली क्रमांक १०५ कडेचा..अगदी जिन्याशेजारचा वर्ग होता...एक दिवस सायंकाळी शेवटचा तास संपल्याची बेल वाजली आणि पहिल्या बेंचवर असलेला मी पळत पळत...उड्या मारत खाली आलो... जिन्याच्या शेवटच्या पायरीवर उडी मारुन...तेथे असलेल्या सिमेंटच्या खांबाला धरुन एकच पायरी उतरुन असणाऱ्या आणि मागच्या गेट कडे जाणाऱ्या 'उत्तम मुंगी कला मंदिर...

तीन भावंडासह आईचा मृतदेह विहीरीत आढळला

इमेज
संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा गावातील घटना   संगमनेर  :  संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगांवजवळील खांडगेदरा गावात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एका विहीरीत तीन भावंडासह आईचा मृतदेह आढळला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घारगांव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. मृतात २८ वर्षीय आईसह पाच व साडेतीन वर्षाच्या दोन मुली व चार महिन्याच्या मुलाचा समावेश आहे. पोलिसांनी या संदर्भात अकस्मात मृत्युची नोंद केली असुन मृतदेह वैद्यकीय अहवालासाठी संगमनेरच्या कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. मृत्युचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.                 खांडगेदरा गावात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. स्वाती बाळासाहेब ढोकरे (वय २८ वर्षे), भाग्यश्री बाळासाहेब ढोकरे (वय ५ वर्षे), माधुरी बाळासाहेब ढोकरे (वय साडेतीन वर्षे)  व शिवम बाळासाहेब ढोकरे (वय चार महिने) यांचा समावेश आहे. या सर्वांचे मृतदेह त्यांच्या घराशेजारील विहीरीत आढळून आले आहेत.   य...