कोणत्याही कारणाने बिघडू शकते संगमनेरची कायदा व सुव्यवस्था
संगमनेर शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी पदाधिकाऱ्यांना बजावल्या 149 च्या नोटिसा संगमनेर | अनंत पांगारकर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्या पोलिस प्रशासनाच्या खांद्यावर आहे, त्या पोलिस प्रशासनाला येथील कायदा-सुव्यवस्था कोणत्याही किरकोळ घटनेमुळे बिघडू शकते याचा साक्षात्कार झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सण-उत्सव आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भोंग्यामुळे पोलीस प्रशासनाने येथील राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना 149 च्या नोटिसा बजावल्या आहेत. यदा कदाचित जर शहरात काही घडलेच तर याची जबाबदारी या पदाधिकाऱ्यांवर असेल असा इशाराही पोलीस निरीक्षकांनी दिला आहे. गेल्या काही दिवसात संगमनेरमध्ये घडत असलेल्या वेगवेगळ्या घटनांमुळे पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हे नोंदविले गेले आहे. धार्मिक सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या नोटिसा देणे हा पोलिसांचा नित्यक्रम असला तरीदेखील या वेळच्या या नोटिसाना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण गेल्या काही दिवसात पोलीस अधिकारी विरुद्ध संगमनेरकर असा संघर्ष येथे अनुभवण्यास मिळत आहे. विशेषता येथील बेकायदेशीर कत्त...