पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्र द्रोही राज्यपाल गो बॅक दिल्ली

इमेज
  महाराष्ट्र द्रोही राज्यपाल गो बॅक दिल्ली संगमनेरात युवा सेनेची स्वाक्षरी मोहीम संगमनेर हिंदुमध्ये फुट पाडणाऱ्या, मराठी माणसाचा सतत अपमान करणाऱ्या राज्यपालांना केंद्राने परत बोलावून घ्यावं यासाठी संगमनेर युवासेनेच्या वतिने "स्वाक्षरी मोहीम" राबवण्यात आली. महाराष्ट्रद्रोही राज्यपाल कोशारी यांचा जाहिर निषेध करण्यात आला. यावेळी नागपुर संपर्क प्रमुख नरेश माळवे, संगमनेर शहरप्रमुख अमर कतारी, उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब हासे, कार्याध्यक्ष दीपक साळुंखे, युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवासेना शहरप्रमुख अमोल डुकरे, प्रथमेश बेल्हेकर, युवासेना तालुका प्रमुख राजु सातपुते, उपशहरप्रमुख ईम्तायज शेख, वेणुगोपाल लाहोटी, फैसल सय्यद, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष सचिन साळवे, वैभव अंभग, अजिज मोमीन, अक्षय गाडे, दिनेश पारवे, प्रशांत खजुरे, संभव लोढा, गणेश वलवे, नारायण पवार, भारत शिंदे, अभिषेक साबळे, संगमनेर शिवसेना, युवासेना पदाधिकारी व  शिवसैनिक उपस्थित होते.

शिर्डीच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी बबनराव घोलप नानांवर

इमेज
  बबनराव घोलप यांच्या रूपाने शिर्डीत पुन्हा एक 'नाना' अहमदनगरच्या संपर्कप्रमुख पदी सुनील शिंदे मुंबई  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नगर जिल्ह्याकरिता जिल्हा संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी बबनराव घोलप यांची वर्णी लागली आहे तर अपेक्षेप्रमाणे अहमदनगरचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांना हटविण्यात आले असून त्यांच्या जागी शिर्डीचे संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांनी पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे. तर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून नगर दक्षिण जिल्ह्यातील संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांना हटवण्यासाठी अनेक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. मागील विधानसभा निवडणुकीनंतर संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर आणि शहरातील काही नगरसेवक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होते मात्र शेवटप...

नवे आव्हान | निष्क्रिय पोलीस अधिकारी खरोखर गुन्हेगार शोधणार का!

इमेज
संगमनेर | अनंत पांगारकर अज्ञात चोरट्यांनी शहराच्या लोकवस्तीतील एटीएम मशीन फोडून तब्बल तीस लाखाची रोकड लंपास केली आहे. त्यामुळे आत्तापर्यंतच्या एकाही एटीएम फुटीचा तपास लाऊ न शकणारे संगमनेरातील निष्क्रिय पोलीस अधिकारी या एटीएम फुटीचा  खरोखरच तपास लावू शकतील का याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. शहर पोलीस आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर या प्रकारामुळे नवे आव्हान उभे ठाकले आहे. संगमनेर शहरातील मध्यवस्तीत असलेल्या दिल्ली नाका परिसरात ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीन आहे. हे एटीएम मशीन बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडले आहे. दोघा अज्ञात चोरट्यांनी हे मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली आहे. असे असले तरी अद्यापपर्यंत पोलिसांना आरोपीचा माग लागू शकलेला नाही. एटीएम मशीनची तोडफोड करत मशीनमधील 30 लाख 58 हजार 500 रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे.  बुधवारी मध्यरात्री गुन्हा घडला असला तरी तो दाखल करण्यासाठी पोलिसांना गुरुवारी दुपारचे 4:30 वाजले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करत तपास सुरू केला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्...

असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण

इमेज
संगमनेर | अनंत पांगारकर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट आणि गणांसाठी गुरुवारी आरक्षण सोडत  काढण्यात आली. या आरक्षण सोडतीमध्ये अखेर गट आणि गणांचे आरक्षण निश्चित करण्यात आल्यानंतर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी मोर्चे बांधणीस सुरुवात केली आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या संगमनेर मधील दहा  गटासाठी जाहीर करण्यात आलेले आरक्षण पुढीलप्रमाणे :-  समनापुर गट : सर्वसाधारण महिला   तळेगाव गट : नागरिकांचा मागास प्रवर्ग  आश्वी बुद्रुक गट : अनुसूचित जमाती महिला   जोर्वे गट : सर्वसाधारण  संगमनेर खुर्द गट : सर्वसाधारण  घुलेवाडी गट : अनुसूचित जाती महिला   धांदरफळ बुद्रुक गट : सर्वसाधारण महिला   चंदनापुरी गट : सर्वसाधारण महिला  साकुर गट : सर्वसाधारण  बोटा गट : सर्वसाधारण   संगमनेर पंचायत समिती गणासाठी तहसील कार्यालयात   संस्कार धोत्रे या सात वर्षीय मुलाच्या हाताने चिठ्ठ्या काढण्यात आल्या. संगमनेर तालुक्यातील पंचायत समितीच्या वीस गणासाठीचे आरक्षण पुढीलप्रमाणे :-  निमोण गण : नागरिकांचा मागास प्रवर्ग  समनापुर ग...

महसूलची बेअब्रू, 50 हजाराची लाच घेताना कर्मचारी पकडला

इमेज
  अहमदनगर  राज्यात नवे सरकार सत्तेवर आरुढ झाले असले तरी शासकीय कार्यालयामध्ये काम करण्यासाठी लाच स्वीकारण्याचा सिलसिला थांबण्यास तयार नाही. लाचखोरीचा असाच प्रकार बुधवारी समोर आला आहे. शेवगाव तहसिलदार कार्यालयातील गौण खनिज विभागातील एका लिपिकाला पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आल्याने महसूल विभागाची पुरती नाचक्की झाली आहे. नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली. वाळूच्या गाड्या सोडण्या साठी ही लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. महसूल विभागाची आर्थिक साठे लोटे करून सर्रासपणे जिल्ह्यात वाळूचे अवैधरित्या उत्खनन सुरू आहे. यातून कमी श्रमात जास्त पैसा मिळत असल्याने जिल्ह्यात या वाळू व्यवसायात मोठ्या प्रमाणावर तरुणही उतरले आहेत. याशिवाय या व्यवसायात मोठ्या प्रमाणात सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाऱ्यांनी आपले बस्तान बसविले आहे. वाळू तस्करीत उतरलेल्या अनेकांचे यंत्रणेशी अर्थपूर्ण संबंध आहेत.  अशाच एका प्रकरणात महसूलच्या एका लिपिकाने एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती त्यामुळे या युवकांनी त्याला पकडून देण्याचा निर्धार करून नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रा...

पराभव समोर दिसत असल्यानेच राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या : किसान सभा

इमेज
संगमनेर  पावसाचे कारण देत राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यभरात वेगवेगळ्या कारणाने अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका सातत्याने पुढे ढकलण्यात आलेले आहेत. आता सुरु असलेल्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. अनेक संस्थांच्या निवडणुकांमध्ये केवळ मतदानाची प्रक्रिया बाकी आहे. अशा परिस्थितीमध्ये अचानक निवडणुका पुढे ढकलल्या ही अत्यंत लोकशाहीविरोधी कृती आहे. हा सत्तेचाही दुरुपयोग आहे.  राज्यभरातील अनेक सहकारी संस्थांमध्ये भाजपला आपला पराभव दिसत असल्यामुळेच शिंदे भाजपा सरकारने हा लोकशाही विरोधी निर्णय घेतलेला आहे. किसान सभेच्या वतीने राज्य सरकारच्या या निर्णयाचा आम्ही धिक्कार करत आहोत.  राज्य सरकारने तातडीने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा व सहकारी संस्थेत लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन किसान सभेच्या वतीने राज्य सरकारला करत आहोत. डॉ. अजित नवले  सरचिटणीस  अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र अनंत पांगारकर... 7588600950

'हे' आहेत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीचे निर्णय

इमेज
 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय 1. पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय (वित्त विभाग) 2. राज्यात "स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान" राबविण्यात येणार (नगर विकास विभाग) 3. केंद्र पुरस्कृत अमृत अभियान 2.0  (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबवणार (नगर विकास विभाग) 4. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार (नगर विकास विभाग) 5. राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा (ग्रामविकास विभाग) 6. अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढवणार 7. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1969 मधील कलम 43 मध्ये सुधारणा. (ग्रामविकास विभाग) 8. बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मध्ये सुधारणा (पणन विभाग) 9. आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करण...

इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंटपदी वृषाली कडलग तर ज्योती पलोड सेक्रेटरी

इमेज
संगमनेर :- येथील स्वार्थ विरहित सेवेच्या माध्यमातून लोकप्रिय असलेल्या इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंटपदी वृषाली कडलग यांची तर  सेक्रेटरीपदी ज्योती पलोड यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती मावळत्या प्रेसिडेंट डॉ. दिपाली पानसरे यांनी दिली आहे. इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या नूतन पदाधिकऱ्यांचा पदग्रहण समारंभ १८ रोजी मालपाणी हेल्थ क्लब , संगमनेर येथे सायंकाळी ६ वाजता समारंभपूर्वक आयोजित करण्यात आला असून त्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून इनरव्हील जिल्हा ३१३ च्या चेअरमन मुक्ती पानसे, संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे , जिल्हा ३१३ च्या व्हॉईस चेअरमन रचना मालपाणी उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी इनरव्हील क्लब तर्फे धांदरफळ येथील इयत्ता आठवी ते दहावी या वर्गात शिकणाऱ्या ११ गरजू विद्यार्थिनींना शाळेत येणे सुकर होण्यासाठी मोफत सायकली देण्यात येणार असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्षा वृषाली कडलग यांनी दिली. क्लबची कार्यकारिणी खालील प्रमाणे - प्रेसिडेंट वृषाली कडलग, सेक्रेटरी ज्योती पलोड, व्हॉईस प्रेसिडेंट डॉ. श्रद्धा वाणी , आय .पी .पी . डॉ. दिपाली पानसरे, खजिनदार सुनीता गाडे, आय. एस. ओ...

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती

इमेज
  अहमदनगर, राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या २८४पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देण्यात आलेला आरक्षण सोडत कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.  राज्य निवडणूक आयोगाने ५ जुलै २०२२ रोजीच्या पत्रान्वये संबंधित जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिला होता; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेसंदर्भात आज सुनावणी झाली. एका आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम स्थगित केला आहे. सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे. ०००

ज‍िल्ह्यात पुढील तीन द‍िवस अत‍िवृष्टीचा इशारा

इमेज
  गोदावरीत 27868 व भीमेत 23819 क्यूसेस पाण्याचा व‍िसर्ग   नागर‍िकांना अत‍िदक्षतेचा इशारा सखल भागातील नागर‍िकांचे सुरक्ष‍ित स्थळी स्थलांत‍र करावे अहमदनगर,  हवामान व‍िभागाने ज‍िल्ह्यात 11 ते 14 जूलै या कालावधीत अत‍िवृष्टीचा इशारा द‍िला आहे.  ज‍िल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून 27868 क्यूसेस व भ‍िमा नदीस दौंड पूल येथे 23819 क्युसेस पाण्याचा व‍िसर्ग सोडण्यात आला आहे. वरील वस्तुस्थ‍िती लक्षात घेता ज‍िल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राध‍िकरणातर्फे ज‍िल्ह्यातील नागर‍िकांना अत‍िदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सखल भागात राहणाऱ्या नागर‍िकांनी तात्काळ सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करावे. असे आवाहन ज‍िल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राध‍िकरणाचे मुख्य कार्यकारी अध‍िकारी तथा न‍िवासी उपज‍िल्हाध‍िकारी संदीप न‍िच‍ित यांनी प्रस‍िध्दीपत्रकाद्वारे केले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 166.3 मि.मी. (37.1 %) पर्जन्यमान झालेले आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीस नाशिक जिल्ह्यातील विविध धरणाद्वारे सोडलेल्या विसर्गामुळे नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून 27,868 क्युसेस तसेच भिमा नदीस पुणे जि...

केंद्रीय पथकाकडून जलशक्ती अभियानातील कामांची पाहणी

इमेज
  राळेगणसिद्धी व हिवरेबाजारला भेट,  तीन दिवसीय दौऱ्याची सांगता अहमदनगर, केंद्रांच्या जलशक्ती अभियानातील 'कॅच द रेन' उपक्रमांतर्गत केंद्रीय पथकाने तीन दिवसीय दौऱ्यात जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाची आढावा बैठक घेण्यात आली. राळेगणसिद्धी, हिवरेबाजार सोबत इतर गावांना भेटी देत जलसंधारणांची कामे जाणून घेतली.  केंद्रीय गृह मंत्रालयाचे उपसचिव  राहुल मलिक व तंत्र अधिकारी डॉ. एस. आर. स्वामी या दोन सदस्यीय तज्ज्ञ पथकाने ५ जूलै ते ७ जूलै २०२२ कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणांना भेटी दिल्या.  केंद्रीय पथक सदस्यांच्या उपस्थितीत  जिल्हाधिकारी कार्यालयात ५ जूलै रोजी बैठक घेण्यात आली. बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, उपजिल्हाधिकारी उदय किसवे, उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, जिल्हा जलसंधारण अधिकारी मनोज ढोकचौळे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध विभागांनी केलेल्या जलसंधारण कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला‌. याचदिवशी पारनेर मधील 'हंगा' पाझर तलावाच्या दुरुस्ती कामास भेट देऊन पाहणी करून मार्गदर्शनपर सूचना दिल्या. ज्येष्ठ स...