पोस्ट्स

लेखापरीक्षकाला एक वर्षाची कैदेची शिक्षा

इमेज
धनादेशाचा अवमान प्रकरणी भरपाई म्हणून सोळा लाख बारा हजार पाचशे रुपये देण्याचे न्यायालयाचे आदेश आरोपी मुंबईतील लेखापरीक्षक संगमनेर शेअर मार्केट मधील व्यवहारात तोटा आल्याने त्याची जबाबदारी स्वीकारत मुंबईतील मुलुंडमध्ये राहणाऱ्या लेखापरीक्षकाने दिलेला धनादेश न वटल्याने संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी लेखा परीक्षक असलेल्या आरोपीस एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय फिर्यादीस 16 लाख 12 हजार 500 रुपये देण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले. संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथील सविता कानवडे यांनी आपल्या ओळखीच्या असलेल्या मुंबई येथील राजेश मुलजीभाई रूपारेल या लेखापरीक्षकाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती. संबंधित महिलेचे ट्रेडिंग अकाउंट आरोपी राजेश रूपारेल यांनी हाताळले होते. शेअर मार्केटच्या या व्यवहारात कानवडे यांना तोटा सोसावा लागला. त्यामुळे रूपारेल यांनी कायदेशीर रक्कम देण्याची जबाबदारी स्वीकारत फिर्यादी महिलेस आयसीआयसीआय या बँकेचा मुलुंड शाखेचा 12 लाख 90 हजार रुपयांचा धनादेश दिला होता. कानवडे यांनी हा धनादेश त्यांच्या खात्यामध्ये भरला असता ...

मुख्यमंत्र्यांसारखे दिसणे आणि वागणे पडले महागात

इमेज
तोतया मुख्यमंत्र्यावर पुण्यात गुन्हा दाखल पुणे:  हुबेहूब मुख्यमंत्र्यांसारखा पेहराव करणाऱ्या, दिसणाऱ्या आणि वागणाऱ्या विजय माने याने सराईत गुन्हेगारांसोबत फोटो काढून ते समाज माध्यमात व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी तोतया मुख्यमंत्र्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विजय माने हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा पेहराव करून समाजात वेगवेगळ्या कार्यक्रमात जाऊन लोकांमध्ये गैरसमज निर्माण होईल अशा पद्धतीने वावरत असे.  माने याने मुख्यमंत्री शिंदे यांची समाजातील प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने सराईत गुंडासोबत काढलेला फोटो समाजामध्ये गैरसमज पसरविण्याच्या हेतूने समाज माध्यमांमध्ये व्हायरल केल्याप्रकरणी खंडणी विरोधी पथक २ चे पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांच्या तक्रारीवरून बंडगार्डन पोलीस ठाण्यात आरोपी विजय नंदकुमार माने याच्या विरोधात भांदवी कलम ४१९, ५११, ४६९, ५००, ५०१, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलीस यासंदर्भात अधिक तपास करीत आहेत.

गहलोत, भुजबळांच्या उपस्थितीत होणार जयंती महोत्सव पुरस्कार वितरण सोहळा

इमेज
संगमनेर, अनंत पांगारकर ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात आणि हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराचे वितरण शुक्रवारी (23 सप्टेंबर) राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मंत्री विधिमंडळाचे पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती आमदार डॉ सुधीर तांबे यांनी दिली. कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेला जयंती महोत्सव समारंभ 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला असून 'डॉ. आ. ह. साळुंखे' यांना 'स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार', 'डॉ. सुधीर भोंगळे' यांना 'डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार' आणि माजी मंत्री मांजरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष 'दिलीपराव देशमुख' यांना 'सहकारातील नेतृत्व' पुरस्काराने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय जयंती महोत्सवानिमित्त शनिवारी (24 सप्टेंबर) द...

अमरधाम प्रकरण । पालिकेच्या दोघा अभियंत्यांवर फसवणुकीचा गुन्हा

इमेज
संगमनेर, भारतीय जनता पक्षाने केलेल्या कथित गैरव्यवहाराच्या आरोपानंतर बहुचर्चित ठरलेल्या संगमनेरच्या अमरधाम सुशोभीकरणाच्या कामात निविदा काढून फसवणूक केल्याप्रकरणी नगरपरिषदेतील दोघा अभियंत्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र सुतावणे आणि सूर्यकांत गवळी अशी दोघा अभियंत्यांची नावे आहेत. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी या दोघा अभियंत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शिंदे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, संगमनेर नगरपरिषद हद्दीतील अमरधाम सुशोभीकरण आणि नूतनीकरणाच्या टप्पा दोन आणि तीन मधील कामे निविदा काढण्यापूर्वीच केलेली असताना सादर करणे आवश्यक होते. मात्र तसे न करता निविदा काढून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान येत्या काही दिवसात नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने भारतीय जनता पक्षाने हा प्रश्न प्रतिष्ठेचा केला होता. या संदर्भात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी न्यायालयात देखील जाणार असल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांनी म्हटले होते. अखेरीस या संदर्भात गुन्हा दाखल झाल्याने आता पु...

खताळ यांनी शेतकर्‍यांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला

इमेज
 मधुकर नवले यांचे प्रतीपादन संगमनेर, माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांचे काम निष्पृह होते. सहकार, शिक्षण अश्या विविध संस्थांची पायाभरणी करतांना त्यांनी कधीही स्वतःला स्वार्थाचा लवलेश लागू दिला नाही. ज्या संस्थांची त्यांनी निर्मीती केली त्या सर्व त्यांनी लोकांच्या मालकीच्या केल्या. मंत्रीपदाच्या काळात राज्यात अनेक धरणांची निर्मीती करुन त्यांनी लाखो हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आणले. यातुन अनेक कोरडवाहु शेतकर्‍यांच्या शेतीचे नंदनवन झाल्याने त्यांनी खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला, असे प्रतिपादन अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले यांनी केले. ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी, माजी मंत्री डॉ. बी. जे. खताळ यांच्या तिसर्‍या पुण्यतिथीनिमीत्त आयोजित कार्यक्रमात नवले बोलत होते. अध्यक्षस्थानी योगवर्धीनी संगमनेरचे अध्यक्ष डॉ. सुधाकर पेटकर होते. यावेळी प्राचार्य सहदेव चौधरी, प्राचार्य ज्ञानेश्वर गोंन्टे, जनसेवाचे अध्यक्ष साहेबराव वलवे, विठ्ठल शेवाळे,  वसंतराव देशमुख, विक्रमसिंह खताळपाटील, रावसाहेब डुबे,  भास्करराव खताळ आदी उपस्थित होते. माजी मंत्री खताळ यांचा जीवनप...

कारखाना आणि सभासदांमधील संवाद सेतू आता एका क्लिकवर

इमेज
माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते स्मार्ट कार्डचे वितरण फोटो ओळी थोरात कारखान्याने सभासदांसाठी तयार केलेल्या स्मार्ट कार्डचे वितरण राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. संगमनेर संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने सभासदांसोबत संवाद साधण्यासाठी स्मार्ट कार्डच्या माध्यमातून नवी प्रणाली विकसित केली आहे. यामुळे सभासदांसोबतचा संवाद सेतू आता एका क्लिकवर साध्य होणार असल्याचे राज्याचे माजी महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. कारखान्याने सभासदांच्या सोयीसाठी आणि कामकाज सोपे करण्याच्या दृष्टीने सभासदांकरिता स्मार्ट कार्डची निर्मिती केली असून यामुळे कारखान्यासंबंधी माहिती सभासदांना आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. या स्मार्ट कार्डचे वितरण माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना करण्यात आले. हे कार्ड सभासदांना कारखान्याचे सभासदत्व असेपर्यंत वापरता येणार असून एकदा कार्ड घेतल्यानंतर दरवर्षी नवीन कार्ड घेण्याची आवश्यकता सभासदांना भासणार नाही. सभासदांना आपल्या मोबाईलवर स्मार्ट कार्डवरील क्यू ...

पंतप्रधान मोदींनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले

इमेज
संगमनेर देशातील ग्रामीण भागाचा विकास करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जात, धर्म, पंथ याचा कुठेही अडसर येवू दिला नाही. शौचालयापासून ते पिण्याच्या पाण्यापर्यंत योजनारुपी सहकार्य करताना, त्यांनी सामान्य माणूसच केंद्रीभूत मानला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले. येणारा काळही ग्रामीण भारताच्या उज्ज्वल भविष्याचा अमृतकाळ असेल असे प्रतिपादन केंद्रीय अन्नपक्रीया आणि जलशक्ती विभागाचे राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत उत्तर नगर जिल्ह्यातील सरपंच, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सदस्यांचा लोकप्रतिनिधी मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यात मंत्री पटेल यांनी ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींची जबाबदारी आणि मोदी सरकारने मागील आठ वर्षात ग्रामीण भागाकरीता निर्माण केलेल्या पायाभूत सुविधांची माहिती आपल्या भाषणातून दिली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, लोकसभा मतदार संघाचे प्रभारी आ. डॉ. राहुल आहेर, म...