एमपीएससी परीक्षेत एकाच वेळी अमृतवाहिनीचे 27 विद्यार्थी

 


स्पर्धा परीक्षेत अमृतवाहिनी शिक्षण संस्थेची गौरवास्पद कामगिरी

संगमनेर | अनंत पांगारकर

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल विभागातील सत्तावीस विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळविले. असून यामुळे अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे व प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी दिली आहे.

डॉ. वेंकटेश म्हणाले, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने नॅकचा 'अ' प्लस हा दर्जा मिळवला आहे. सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन, आधुनिक व हायटेक उच्च शिक्षणाच्या सुविधा याचबरोबर गुणवत्तापूर्ण शिक्षण यामुळे ग्रामीण भागात असूनही अमृतवाहिनी महाविद्यालय हे देशभरात लौकिकास्पद ठरले आहे. येथे सातत्याने संशोधनाला वाव दिला जात असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. यामुळे 2019 च्या एमपीएससी परीक्षेत या महाविद्यालयाच्या सिव्हिल विभागातील 27 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.

या विद्यार्थ्यांच्या झाल्या निवडी

जलसंधारण विभागात उपविभागीय अधिकारी म्हणून प्रतिभा सखाराम खेमनर व शिवम भापकर, सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता पदावर स्वाती कुवर, राहुल गुंजाळ आणि बाळासाहेब गीते, जलसंपदा विभागात उपअभियंता पदावर प्रसाद नवले, शुभम सोनवणे, योजना गोरे, अक्षय कारले, पूजा पैय्यावल, श्वेता झावरे, प्रवीण गायकवाड, ज्ञानेश्वर बत्तीसे, किंजल जनबंधू, राहुल वाकचौरे, ऋषिकेश राऊत, प्रणव वरपे, राजेश कवडे, देवेंद्र दिघे, रामदास घुगे, पंकज शिंदे, दुर्गा कानवडे, श्रद्धा पवार, आकाश गुंजाळ, संदीप कोल्हे, अजित गवांदे व कल्पेश कदम यांची निवड झाली आहे.

एकाच वेळेस 27 विद्यार्थी एमपीएससीत निवडली जाण्याची ही राज्यातील कोणत्याही महाविद्यालयातील पहिलीच वेळ ठरणार आहे. या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख प्रा. डॉ. मधुकर वाकचौरे, डॉ. जे. बी. गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, बाळासाहेब गुंजाळ, बाजीराव खेमनर, विश्वस्त शरयूताई देशमुख, इंद्रजीत थोरात, लक्ष्मणराव कुटे, आर. बी. सोनवणे, संपतराव गोडगे, दुर्गाताई तांबे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, मॅनेजर प्रा. व्ही. बी. धुमाळ, उपप्राचार्य प्रा. अशोक मिश्रा, विभाग प्रमुख डॉ. मधुकर वाकचौरे, रजिस्ट्रार प्रा. विजय वाघे, डॉ. गुरव यांनी अभिनंदन केले आहे.




स्वच्छ व हिरवाई अभ्यासाला पोषक वातावरण

अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचा सर्व परिसर हा अत्यंत स्वच्छ, सुंदर व विविध वृक्षांनी हिरवागार असून यामुळे प्रसन्न वातावरण हे या संस्थेची वैशिष्ट्ये ठरले आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा, क्रीडांगण, लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यामुळे यश मिळाले असल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले.

टिप्पण्या