किरीट सोमय्यावर हल्ला कराल तर दिसताक्षणी गोळ्या ?

 



मुंबई | सौ शहरी एक संगमनेरी


विविध आरोपातून महा विकास आघाडी सरकारला जेरीस आणणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर दोन वेळा झालेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीत सीआयएसएफच्या हेडक्वार्टरने या हल्ल्याची गंभीर दखल घेतली आहे. 


माहितीनुसार त्यांच्यावर पुन्हा हल्ला झाला हल्लेखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात येणार आहेत.


सरकारने झेड सुरक्षा दिलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर दुसऱ्यांदा हल्ला झाल्याने मुंबई पोलिसांकडे याबाबत जाब विचारला गेला. पहिला हल्ला त्यांच्यावर पुणे महानगरपालिकेत झाला होता. त्यानंतर सोमय्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दांपत्याला भेटण्यासाठी गेले असता मुंबईमध्ये खार पोलीस ठाण्याबाहेर त्यांच्यावर दुसऱ्यांदा हल्ला झाला. त्यामुळे सीआयएसएफने या हल्ल्याची गंभीरतेने दखल घेतली आहे. 


मुंबईच्या पोलीस आयुक्तांशी सीआयएसएफचे कमांडर यांनी चर्चा केल्याची माहिती पुढे येत आहे. शिवसैनिकांनी हल्ला केल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. घडलेल्या घटनेनंतर किरीट सोमय्या यांच्या जवानांना प्रत्येक कार्यक्रमात अतीदक्ष राहून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

टिप्पण्या