मुख्यमंत्र्यांसारखे दिसणे आणि वागणे पडले महागात
तोतया मुख्यमंत्र्यावर पुण्यात गुन्हा दाखल
पुणे:
हुबेहूब मुख्यमंत्र्यांसारखा पेहराव करणाऱ्या, दिसणाऱ्या आणि वागणाऱ्या विजय माने याने सराईत गुन्हेगारांसोबत फोटो काढून ते समाज माध्यमात व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी तोतया मुख्यमंत्र्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विजय माने हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा पेहराव करून समाजात वेगवेगळ्या कार्यक्रमात जाऊन लोकांमध्ये गैरसमज निर्माण होईल अशा पद्धतीने वावरत असे.
माने याने मुख्यमंत्री शिंदे यांची समाजातील प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने सराईत गुंडासोबत काढलेला फोटो समाजामध्ये गैरसमज पसरविण्याच्या हेतूने समाज माध्यमांमध्ये व्हायरल केल्याप्रकरणी खंडणी विरोधी पथक २ चे पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांच्या तक्रारीवरून बंडगार्डन पोलीस ठाण्यात आरोपी विजय नंदकुमार माने याच्या विरोधात भांदवी कलम ४१९, ५११, ४६९, ५००, ५०१, माहिती
तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलीस यासंदर्भात अधिक तपास करीत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा