सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराची घोषणा डॉ. आ. ह. साळुखे यांना थोरात तर डॉ. सुधीर भोंगळे यांना शिंदे स्मृती पुरस्कार
सहकारमहर्षी
भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती
पुरस्काराची घोषणा
डॉ. आ. ह. साळुखे यांना थोरात तर
डॉ. सुधीर भोंगळे यांना शिंदे स्मृती पुरस्कार
संगमनेर : सहकारातील
दीपस्तंभ व दंडकारण्य अभियानाचे प्रणेते, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या
नांवाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ विचारवंत, लेखक
डॉ. अण्णासाहेब हरी साळुंखे यांची तर कृषीक्रांतीचे प्रणेते
डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या नांवाने दिल्या जाणाऱ्या
स्मृती पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार, लेखक व कृषी तज्ज्ञ
डॉ. सुधीर भोंगळे यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी १ लाख रुपये रोख व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी या पुरस्कारांची घोषणा
केली.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमीत्ताने थोरात कारखान्याच्या प्रेरणास्थळी आयोजित अभिवादन सभेत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, प्रा. बाबा खरात, केशव जाधव, माधवराव कानवडे आदी यावेळी उपस्थित होते.
सहकार, समाजसेवा, पर्यावरण, पत्रकारीता
या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीला सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती
पुरस्कार, कृषी, शिक्षण, साहित्य व संशोधन या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीला डॉ.
अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षी या दोन्ही पुरस्कारासाठी अनुक्रमे डॉ. आ.
ह. साळुंखे व डॉ. सुधीर
भोंगळे यांची निवड करण्यात आली. महसुलमंत्री बाळासाहेब थोरात
यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी संगमनेरमध्ये होणाऱ्या भव्यदिव्य जयंती महोत्सवात
या पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण केले जाते. याशिवाय
संगमनेरकरांना सांस्कृतिक कार्यक्रमाचीदेखील या निमीत्ताने मेजवाणी मिळत असते.
यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला
आहे. बुधवारी झालेल्या जयंती दिनी केवळ या पुरस्काराची घोषणा
करण्यात आली.
कृषीरत्न विजय
अण्णा बोर्हाडे, आमदार डॉ. सुधीर तांबे,
उल्हास लाटकर, डॉ. राजीव
शिंदे, उत्कर्षा रुपवते, प्रा. बाबा खरात, केशवराव जाधव यांचा या पुरस्कार समितीत
समावेश असून समितीने ही नावे निश्चित केल्यानंतर त्यांची घोषणा करण्यात आली.
(चौकट)
डॉ. आ. ह. साळुंखे
सहकारमहर्षी
भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कारासाठी निवड झालेले डॉ. आ. ह. साळुंखे हे प्रसिध्द
लेखक असून व्याख्याते, विचारवंत व गाढे अभ्यासक आहेत. त्यांचे अंधारातील बुरुज ढासाळतील, एकलव्य, प्राईड आफ स्वराज्य, उमाजी राजे नाईक, तुकारामांचा शेतकरी, विद्रोही तुकाराम आदीसह ६०
पुस्तके प्रकाशित झाली आहे. त्यांना राज्य पातळीवरील विविध
पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राज्यभरात ४० हजार
किलोमीटरचा प्रवास करत त्यांनी अनेक व्याख्याने दिली.
(चौकट)
डॉ. सुधीर भोंगळे
डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कारासाठी निवड झालेले डॉ. सुधीर भोंगळे यांनी विविध दैनिकामध्ये वरीष्ठ पदावर काम केले. शेतीवर वादळ, विकास वाटा, पाणीदार
जलसिंचनासह त्यांची १० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. राष्ट्रवादी
कॉग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर आधारीत नेमकेची बोलणे हा चरित्रग्रंथदेखील
नुकताच प्रकाशित झाला आहे. शेती, सहकार,
पाणी, उर्जा अशा विषयावर देश, परदेशातील विद्यापीठात त्यांनी व्याख्याने दिली आहे.
-------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा