माझ्या स्मृति पटलावरील दादा... तीर्थरूप भाऊसाहेब थोरात




माझ्या स्मृति पटलावरील दादा...

तीर्थरूप भाऊसाहेब थोरात


नक्की दिवस आठवत नाही. मात्र ते २००६ साल होते. माझे शिक्षण सुरू असतानाच मी संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहामध्ये रात्रपाळीत काम करत होतो. माझ्या कामाच्या दहा-बारा दिवसातच अतिथी गृहामध्ये जनरल शीपमध्ये काम करणाऱ्या मुलांना बाहेर कुठेतरी कामानिमित्ताने जायचे होते. त्यावेळी कारखाना गेस्ट हाऊचे इन्चार्ज थिटमे साहेब यांनी मला सांगितले की तुला नाईट करून पुन्हा उद्या जनरल ड्युटी करायची आहे. मी होकार दिला. मी रात्रपाळी करून दिवसपाळी करण्यासाठी तयार होतो. सकाळचे साडेनऊ वाजले होते, तोच एका गाडीचा हाॅर्नचा आवाज कानावर आला. ताबडतोब मी गाडीच्या जवळ गेलो आणि गाडीचा दरवाजा उघडला. गाडीतून त्यावेळी एक गृहस्थ खाली उतरले ते दादा म्हणजेच भाऊसाहेब थोरात. प्रथमत:च त्यांना पाहत होतो.


त्यावेळी दादांकडे सफेद कलरची अम्बेसिटर गाडी होती. तसेच दादांचे ऑफीस हे कारखान्याच्या अतिथीगृहातच होते. दादा ज्या ठिकाणी बसायचे त्या ठिकाणी आतमध्ये प्रवेश करताना समोरच माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे यांचा अतिशय सुंदर बोलका उभा असा फोटो लावलेला होता. गाडीतून उतरताच दादा त्यांच्या काठीवर चालत-चालत त्यांच्या ऑफिसमधे गेले. दादांच्या भेटीसाठी पठार आणि डोंगराळ भागातील काही धोतर घातलेले व डोक्यावर मोठा पांढरा फेटा घातलेले लोक आले होते. हे दादांचे कार्यकर्ते होते. 

खुर्चीवर स्थानापन्न होताच दादांनी टेबल वरील बेल वाजवली आणि पहिल्यांदाच मी ती बेल घेण्यासाठी जाणार त्यामुळे छातीत थोडी धाकधूक होतीच, परंतु हळुहळु हलके पाय टाकत आतमध्ये गेलो. मला पाहताक्षणीच मी नवखा असल्याची जाणीव दादांना झाली. माझी होत असलेले धाकधुक लक्षात घेत त्यांनी मला जवळ बोलावले, माझ्याजवळ उभा राहा, असे म्हणत मला दादांनी माझे नाव-गाव विचारले, माझी थोडी धाकधूक झाल्याने मी हळूच आवाजात त्यांना माझे नाव व गाव काकडवाडी सांगितल. गावाचे नाव काकडवाडी सांगताच त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिली आणि म्हणाले तु तळेगाव दुष्काळी पट्यातून आला आहेस, चांगले काम कर. 


मी नवीन व त्याठिकाणी एकटाच होतो हे दादाच्या लक्षात होते. त्यांनी मला सांगितल एका वाटीत साखर घेऊन ये, मग मी वाटीत साखर घेऊन आलो आणि दादा म्हणाले ह्या सर्व पठार भागातील कार्यकर्त्यांच्या हातावर साखर दे, मी त्या सर्वांच्या हातावर साखर दिली. परंतु मला काही कळेनासे झाले. नंतर माझ्या लक्षात आले की, मी एकटाच व नवीन असल्याने तिर्थरूप दादांनी मला चहा ठेवण्याऐवजी सर्वांना साखर देण्यासाठी सांगितले होते.


आदरणीय तिर्थरूप दादा हे अत्यंत कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जात होते. परंतु माझ्यासारख्या शिपायापासून अधिकारी ते कार्यकर्ता यांची ते काळजी कशी घेत होते, याच्या स्मृती आजही माझ्या काळजाच्या पटलावर कायम कोरल्या गेल्या आहेत.


आज तिर्थरूप भाऊसाहेब थोरात (दादा) यांची ९८ वी जयंती त्यानिमित्त आदरणीय दादांच्या चरणी शत शत नमन..!


विशाल काळे, सोशल मीडिया प्रमुख.

टिप्पण्या

  1. मस्त रे विशाल दादांसोबत काम करण्याचा आनंदच वेगळा होता

    उत्तर द्याहटवा
  2. दादां सोबत काम करायला मिळणे खूप मोठी गोष्ट, मस्त लिहिलंय

    उत्तर द्याहटवा
  3. दादा (मोठे साहेब) एक देव संगमनेर चे भाग्यविधाते आमचे आराध्यदैवत
    आदरणीय दादांना विनम्र अभिवादन 💐🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरात 1 कोटी 43 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण

व्यावसायिकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

पंतप्रधान मोदींनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले

एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराची गरज

जिल्हास्तरावर क्रिकेटमध्ये संगमनेरमधील ‘ही’ शाळा ठरली अजिंक्य