राष्ट्रसेवा दलाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी ऍड. समीर लामखडे यांची निवड

संगमनेर : राष्ट्र सेवा दलाच्या अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीची निवडणूक शिवजयंतीच्या दिवशी नगरमध्ये रावसाहेब पटवर्धन स्मारक समितीमध्ये पार पडली. त्यात अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्षपदी संगमनेर येथील अॅड. समीर लामखडे यांची निवड करण्यात आली. तर जिल्हा संघटक म्हणून पाराजी मुसमाडे यांची निवड झाली. 


निवडणूक निरिक्षक म्हणून राष्ट्रसेवा दलाचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे यांनी काम पाहिले. या निवडणुकीत दिनेश खोसे, अश्विनी येणारे, मुकेश गडधे, सुनील मते यांची राज्य मंडळ सदस्य म्हणून निवड झाली, तर प्रा. पुरुषोत्तम पगारे, ऍड रवींद्र शितोळे, लक्ष्मण जेवे, रामदास भोजने, हनुमंत सुद्रिक, भाऊसाहेब माळवदे, हेमराज जावळे, कैलास लेंभे, वसंत कर्डिले, संतोष खेडकर, सोमनाथ बोंतले, सुखदेव होन, रानोबा गोडसे, गणेश कात्रजकर, काजल आसणे यांची सदस्य म्हणून निवड झाली. 


त्रैवार्षिक निवडणुकीच्या या बैठकीसाठी जिल्ह्यातील सुमारे 250 पेक्षा जास्त सेवा दल सैनिक उपस्थित होते. भारतीय संविधान आणि धर्मनिरपेक्षता यांच्या बळकटीसाठी राष्ट्रसेवा दल कटिबद्ध आहे. संविधानाचा विचार प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजवण्यासाठी सेवादल काम करीत असल्याचे प्रा. कोकाटे म्हणाले, 



(कोट)

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात सेवादलाचे काम

" सेवादल घराघरात पोहचवण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सेवादलाचे काम सुरू असून ते संघटन आणखी मजबूत करण्याची जबाबदारी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पार पाडणार आहे."

अॅड. समीर लामखडे.

—--- 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरात 1 कोटी 43 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण

व्यावसायिकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

पंतप्रधान मोदींनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले

एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराची गरज

जिल्हास्तरावर क्रिकेटमध्ये संगमनेरमधील ‘ही’ शाळा ठरली अजिंक्य