ना. यशोमती ठाकूर, ना. थोरात यांच्या उपस्थितीत रविवारी संगमनेरात भव्य महिला मेळावा
आ. प्रणिती शिंदे , आ. डॉ. तांबे, डॉ जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीत महिलांचा कौतुक सोहळा
संगमनेर :
महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या एकविरा फाउंडेशनच्यावतीने कोरोना संकटात सेवाभावी वृत्तीने काम केलेल्या अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका व वैद्यकीय क्षेत्रातील महिला भगिनींच्या कार्यकर्तृत्वाचा कौतुक सोहळा रविवार दिनांक 13 मार्च 2022 रोजी सकाळी 10.00 वा. वसंत लॉन्स येथे राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री नामदार यशोमती ठाकूर, महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात ,आमदार प्रणिती शिंदे ,आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिली.
डॉ. थोरात म्हणाल्या, एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून मागील तीन वर्षात महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. कोरोनाच्या महासंकटात अत्यंत धीरोदत्तपणे काम करणार्या आरोग्य विभागातील महिला भगिनी ,अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचे काम अत्यंत कौतुकास्पद राहिले आहे. या कार्यकर्तृत्वाचा सन्मान व्हावा यासाठी एकविरा फाउंडेशनच्यावतीने यासर्व महिलांचा कौतुक सोहळा महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व महिला व बालकल्याण विकासमंत्री नामदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा व युवा आमदार प्रणिती शिंदे, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, सौ. कांचनताई थोरात, सौ शरयुताई देशमुख, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती मीराताई शेटे, तालुक्याच्या सभापती सुनंदाताई जोर्वेकर यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्या व विविध संस्थांच्या महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
याप्रसंगी तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सेविका यांना सन्मानपत्र, हेल्थकार्ड व आरोग्य किटचे वाटप करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन एकविरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा