धनादेश अनादरप्रकरणी आरोपीची सुटका

 


संगमनेर : साडेबारा लाख रुपयांचा न वटल्याप्रकरणी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या खटल्यात आरोपीची मुक्तता करण्यात आली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. यु. महादर यांच्या न्यायालयासमोर या खटल्याची सुनावणी सुरु होती.

              आरोपी उमेश गोरे यांनी मित्राकडून घरगुती कामासाठी साडेबारा लाख रुपये हातऊसने घेतले होते. सदर रकमेच्या परतावा करण्यासाठी त्यांनी शंभर रुपयांचा मुद्रांकावर करारनामा लिहुन दिला होता. मात्र त्यांनी वेळोवेळी मागणी करुनदेखील फिर्यादीला घेतलेली रक्कम परत न करता त्यापोठी एचडीएफसी बँकेचा धनादेश दिला होता. मात्र हा धनादेश बॅकेत वटला नाही. त्यामुळे फिर्यादीने आरोपी गोरे यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता. या खटल्यामध्ये आरोपीचा व फिर्यादीचा कोणताही आर्थिक संबध नव्हता. आरोपीचा फिर्यादीच्या भावाशी आर्थिक संबध होता. त्यापोटी आरोपी गोरे यांनी फिर्यादीला कोरा व बिनसहीचा धनादेश दिला होता. फिर्यादीने सदर धनादेशाचा दुरुपयोग केला. तसेच फिर्यादीची एवढी मोठी आर्थिक रक्कम हातऊसने देण्याची ऐपत नव्हती. आरोपी हा शिक्षण घेत होता. त्याची फिर्यादीशी कोणतेही मैत्रीचे संबध नव्हते.

              संबंधीत करारनामा ही पुर्णपणे खोटा आहे. ही बाब आरोपीने साक्षी पुराव्यानिशी त्याचे बचावात शाबित केली. आरोपीचे वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे व मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध निकालांचे संदर्भ देवुन युक्तीवाद केला. आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद व बचाव मान्य करीत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. यु. महादर गोरे याची सदर खटल्यातुन निर्दोष मुक्तता केली. आरोपीचे वतीने ॲड. शरीफ पठाण व ॲड. मोहसीन खान यांनी काम पाहिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरात 1 कोटी 43 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण

व्यावसायिकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

पंतप्रधान मोदींनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले

एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराची गरज

जिल्हास्तरावर क्रिकेटमध्ये संगमनेरमधील ‘ही’ शाळा ठरली अजिंक्य