स्व. भाऊसाहेब थोरात यांचा जीवनपट हा सेवाधर्माचा महाप्रवास - आमदार लहू कानडे

 


अमृत उद्योग समूहाच्या वतीने पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन

संगमनेर

मीपण हे आपणामध्ये विसर्जित करून सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी सत्तेच्या मागे न लागता जनतेची सत्ता निर्माण करणारे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा जीवनपट म्हणजे सेवाधर्म दाखवणारा महाप्रवास असल्याचे गौरवोद्गार श्रीरामपूर चे आमदार जेष्ठ साहित्यिक लहू कानडे यांनी काढले आहे .

अमृत उद्योग समूहाच्यावतीने कारखाना कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या बाराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते .यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाजीराव पा. खेमनर होते तर व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कांचनताई थोरात, माधवराव कानवडे, महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, शंकरराव खेमनर, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, संपतराव डोंगरे, अमित पंडित, लक्ष्मणराव कुटे, कार्लोस साठे, नवनाथ आरगडे, उपाध्यक्ष संतोष हासे, रामदास पा. वाघ, आर. बी. राहणे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आमदार लहू कानडे म्हणाले की, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी दिड वर्ष कारावास भोगणार्‍या स्व. भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सत्तेच्या राजकारणाला महत्त्व न देता जनतेची सत्ता निर्माण करण्यासाठी सहकारातून या तालुक्यात समृद्धी निर्माण केली. मागील पन्नास वर्षांमध्ये संगमनेरी केलेली प्रगती ही अदभूत आहे .संगमनेरची फुललेली बाजारपेठ, मेडिकल हब, येथील सांस्कृतिक व सामाजिक सलोखा, ग्रामीण विकास हा देशाला दिशादर्शक ठरणारा आहे .जनहिताचे आयुष्यभर चिंतन करत वैभवशाली दुनिया भाऊसाहेब थोरात यांनी या तालुक्यात उभी केली .मी पणाला आपलेपणा मध्ये विसर्जित करणा-या या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे जीवन चरित्र हे आपल्या सर्वांसाठी कायम मार्गदर्शक ठरणारे आहे. त्यांच्या सेवाधर्माचा समृद्ध वारसा नामदार बाळासाहेब थोरात यांनी जपला असून ही वैचारिक ठेवन असलेली परंपरा यापुढे जपण्यासाठी आपण सर्वजण करत असलेले काम हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले

आमदार डॉ. तांबे म्हणाले की, भाऊसाहेब थोरात यांच्याकडे  विचारांची बांधिलकी होती. त्यांनी कधीही तत्त्वांशी तडजोड केली नाही. आपल्या आदर्शवत तत्वांमधून सहकारातून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवला. हाच विचारांचा वारसा नामदार बाळासाहेब थोरात हे समृद्धपणे जपत आहे. सध्या राजकीय पक्ष बद्दल, विचार बदल हा एक मोठा चिंतेचा विषय आहे. राजकारणातील नैतिक मूल्य जपण्यासाठी सुज्ञ नागरिकांनी पुढे आले पाहिजे .याच बरोबर अशा नीतिमूल्यांची पाठराखण केली पाहिजे असेही ते म्हणाले

बाजीराव खेमनर म्हणाले की, भाऊसाहेब थोरात हे देव माणूस होते. अडचणीतून उभारलेल्या सहकार आज जनमाणसांच्या अडचणी सोडवत आह. ना. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत उद्योग समूह हा  सहकाराचे मॉडेल ठरला आहे.

यावेळी लहानभाऊ गुंजाळ, भाऊसाहेब कुटे, सौ निर्मला ताई गुंजाळ, सौ सुनीताताई अभंग, सौ अर्चना ताई बालोडे, संपतराव गोडगे, चंद्रकांत कडलग, सुभाष सांगळे, डॉ. प्रतापराव उबाळे, शांताराम कढणे, राजेंद्र गुंजाळ, राजेंद्र कडलग, प्रा बाबा खरात, दत्तू खुळे, रोहिदास पवार ,सुरेश थोरात, रमेश गुंजाळ, विष्णू ढोले, यांचेसह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले...




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरात 1 कोटी 43 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण

व्यावसायिकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

पंतप्रधान मोदींनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले

एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराची गरज

जिल्हास्तरावर क्रिकेटमध्ये संगमनेरमधील ‘ही’ शाळा ठरली अजिंक्य