शिवसेना शहर प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

 


संगमनेर- प्रतिनिधी

                        शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी संगमनेर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा मधील मुख्यत: ई-श्रम कार्ड, बाल आधार कार्ड वाटप व मोफत बँक खाते शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा जवळपास 326 व्यक्तींनी लाभ घेतला आहे.

शिवसेना हा केवळ पक्ष म्हणून मर्यादित न राहता शिवसेनेचे कार्यालये म्हणजे दिनदुबळ्या व सामान्य नागरिकांच्या हक्काचे ठिकाण आहे असे म्हंटले जाते. त्याचीच प्रचिती शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयात येते.तेथे सतत गरजू नागरिक आपल्या विविध शासकीय, खाजगी, शैक्षणिक, वैद्यकीय कामांसाठी तिथे येत असतात व त्यांचे कामे पूर्णत्वास नेण्यासाठी शहर शिवसेनेची संपूर्ण टीम कार्यरत असते. संवेदनशील असलेल्या अमर कतारी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना संपर्क कार्यालय येथे भारतीय डाक विभाग संगमनेर शाखेच्या माध्यमातून मोफत ई-श्रम कार्ड व बाल आधार कार्ड वाटप शिबिराचे आयोजन केले होते.

या शिबिरात असंघटित कामगार, मजूर, महिला यांना मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ होणार असून तिनशेहुन अधिक नागरिकांना दोन लाख रुपयांचा मोफत विमा देखील काढून देण्यात आला आहे. तसेच ज्या नागरिकांचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते नाही अश्या नागरिकांचे खाते देखील उघडण्यात आले. 

अश्या विविध योजनांचा लाभ घेण्यात एकूण 326 लाभार्थी पात्र ठरले. संगमनेर शहरात कित्तेक लोक हे कार्ड काढून देण्यासाठी पैसे आकारतात परंतु अमर कतारी यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबीर मोफत ठेवण्यात आले होते. या शिबिरामुळे सर्वसामान्य तसेच गरीब लोकांचा फायदा झाला असून या शिबिराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरात 1 कोटी 43 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण

व्यावसायिकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

पंतप्रधान मोदींनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले

एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराची गरज

जिल्हास्तरावर क्रिकेटमध्ये संगमनेरमधील ‘ही’ शाळा ठरली अजिंक्य