संगमनेरचा हनुमान जयंती उत्सव वादात सापडण्याची चिन्हे गोमांसाच्या आर्थिक व्यवहारात अडकलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना रोखणार
सौ शहरी एक संगमनेरी
निष्ठा आणि प्रताप याचा आदर्श म्हणून देशभरात श्रीरामभक्त मारुतीची उपासणा केली केली. संगमनेरसाठी हा दिवस विशेष महत्वाचा आहे. स्वातंत्रपूर्व काळात या मिरवणुकीला ब्रिटीशांनी सलग दोन वर्ष बंदी घातली. दमनकारी, अनितीमान प्रशासनाविरोधात सामान्य कुटूंबातील रणरागिणींनी एकत्र येत हनुमान रथाची मिरवणूक काढल्याने प्रशासनाला या आदीशक्तीसमोर शरणागती पत्करावी लागली होती. धार्मीक श्रध्देचा अवमान करु नये यासाठी पोलीस प्रशासनाने मानाचा ध्वज आणुन लावावा आणि त्यानंतरच रथ हलेल अशी प्रथा पडल्याने त्यावेळेपासून या मिरवणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मिरवणुकीचा रथ ओढण्याचा मान त्यावेळेपासून या रणरागिणींकडे आहे. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी हा मानाचा ध्वज रथावर चढविल्यानंतर या मिरवणुकीला सुरुवात होते. मात्र स्थानिक पोलीस यंत्रणेच्या एका कृतीमुळे आता हा मान रोखला जाण्याची चिन्हे आहे. यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार सुरु झाला आहे. पोलीस प्रशासनाला जर हा मान कायम ठेवायचा असेल तर जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर अधिक्षक अथवा वरिष्ठ प्रशासनातील अधिकाऱ्यांनाच संगमनेरात येऊन ही परंपरा चालु ठेवता येईल अशी भुमिका घेतली गेली आहे.
गतवर्षी २ ऑक्टोंबरला महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी राज्यातील सर्वात मोठा संगमनेरातील कत्तलखान्यावर नाशिक-नगरच्या पोलीसांनी संयुक्तरित्या टाकल्यानंतर संगमनेरातील गोमांस तस्करी आणि कत्तलखान्याचा प्रश्न समोर आला होता. या छाप्यात स्थानिक पोलीस अधिकारी गोमांस तस्कर, कत्तलखाने चालकांना आर्थिक लाभ घेत संरक्षण देत असल्याचे व तसे पुरावे समोर आल्याची चर्चा झाल्याने संगमनेरकरांनी कत्तलखाने बंद करण्यासाठी आणि हप्तेखोर पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी केलेले आंदोलन दडपण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशीचे लेखी आश्वासन देऊनदेखील कोणतीही चौकशी झाली नाही, उलट ज्या अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले त्यांनीच तपास स्वत:कडे घेत या मुद्द्यावर तपास होणार नाही याची व्यवस्था केली असे दिसत आहे.
यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. प्रशासन जर गांभीर्याने याकडे बघणार नसेल तर सर्व संगमनेरकर हनुमान भक्तांनी एकत्र येत प्रशासनाला आपली भुमिका सांगण्याची आवश्यकता निर्माण होवु लागल्याने यासाठी संगमनेरच्या नवीन नगर रस्त्यावरील प्रांताधिकारी व पोलीस उपअधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर स्वाक्षरी मोहीम सुरु केली जाण्याची शक्यता आहे. यासाठी वकील गणपुले यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे याकडे प्रशासन कसे बघते ते येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.
गोमातेच्या रक्ताने हात रंगलेल्या अधिकाऱ्याच्या हस्ते पुजा नको
हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळीच निघणाऱ्या या विजय रथावर छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमा आहेत. गोमांस तस्करांना संरक्षण देणाऱ्यांचे हात गोमातेच्या रक्ताने रंगलेले आहेत. अशा अधिकाऱ्यांनी श्रीरामभक्त हनुमानाची, शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या साक्षीने पुजा करावी हा हिंदू समाजाच्या धार्मिक भावनांचा अपमान आहे. त्यामुळे असे होवु नये यासाठी अन्य अधिकाऱ्यांना ध्वज घेवून पुजेला पाठवावे असे निवेदन सश्रध्द हिंदू म्हणुन मी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिले आहे.
अड. श्रीराम गणपुले, भाजपा शहराध्यक्ष.
---------


बरं होईल,प्रशासनाला तरी समजेल की संगमनेर मध्ये सगळं आलबेल नाही ते.हि एक चांगली प्रथा पडेल.भ्रष्ट अधिका-यांचे हात पवित्र कार्याला नको लागायला.अन् समाज जागृती पण होईल.खरंच मनापासून गो वंश हत्याबंदी झालीच पाहिजे,मुकी जनावरे असली तरी त्यांनाही भावना असतेच.प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे.अन् गो-माता हिन्दुंचे आदराचे स्थान आहे.जय बजरंग बली.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाझंडा लावण्याचा मान वास्तविकरित्या समाजातील साहित्य, कला, क्रीडा, उद्योग क्षेत्रातील नाव कामावलेल्या आणि धार्मिक कार्यात हातभार लावलेल्या व्यक्तींच्या हाती यावे हिच इच्छा.
उत्तर द्याहटवा