डॉ. आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीला संगमनेरात गालबोट, दोघे अटकेत

संगमनेर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी संगमनेरमध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुकीला गुरुवारी रात्री गालबोट लागले. मेनरोडवर आलेल्या मिरवणुकीत काही मुस्लिम तरुणांनी धुडगूस घातला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी सव्वाशेहून अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यातील अवघ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. डॉ आंबेडकर यांच्या जयंती दिनी संगमनेरमध्ये गुरुवारी सायंकाळी संघर्ष मंडळाने भव्य दिव्य मिरवणूक काढली होती. मिरवणूक रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान मेन रोडवरील मुख्य मार्गावर श्रीकृष्ण मंदिरासमोर आल्यानंतर चांद तारा असलेला हिरवे आणि भगवे ध्वज हातात घेऊन जोरदार घोषणा देत मुस्लिम समाजातील तरुणांचा एक मोठा जमाव या मिरवणुकीमध्ये घुसला. या तरूणांच्या जमावाने मिरवणुकीत धुडगूस घालण्यास सुरुवात केली तसेच महिलांची छेडछाडदेखील केली. महिलांसोबत लज्जास्पद वर्तन करताना धक्काबुक्की, घोषणाबाजी, डॉ. आंबेडकर यांच्या रथासमोर विचित्र हावभाव करत त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचा अवमान केला. मिरवणुकीत घुसलेल्या तरूणांच्या जमावाने अल्ला हू अकबर, इस्लाम जिंदाबाद अशा घोषणा देत मिरवणुकीत बाधा आणण्याचा प्रयत्न केला. मिरवणुकीत बसून दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा तसेच दंगल घडविण्याचा देखील प्रयत्न केला घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी जमावाला तेथून काढून दिल्यानंतर पहाटे या संदर्भात किशोर सुदामराव चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून फिरोज गुलाब बागवान, अहमद कामर चौधरी, अमन समीन बागवान, हुजेब इक्बाल बागवान, सोहेल इक्बाल शेख, अब्रार अजीज खान, हमजा शेख, साबीर शेख, अरबाज शेख, अब्दुल समद कुरेशी, डॅनियल शेख, मारुफ असलम बागवान यांच्यासह सुमारे 125 पेक्षा अधिक लोकांविरोधात ॲट्रॉसिटी राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचविणे, विनयभंग, धार्मिक भावना दुखावणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे आदी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांनी भेट दिल्याची माहिती पोलीस यंत्रणेकडून देण्यात आली असून संगमनेर शहर पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरात 1 कोटी 43 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण

व्यावसायिकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

पंतप्रधान मोदींनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले

एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराची गरज

जिल्हास्तरावर क्रिकेटमध्ये संगमनेरमधील ‘ही’ शाळा ठरली अजिंक्य