महाविकास आघाडीचा भारनियमनाचा शॉक; प्रत्युत्तरादाखल भाजपचा कंदील आंदोलनाचा 'करंट'
संगमनेरात भाजपाचे आंदोलन
सौ शहरी एक संगमनेरी
राज्यात महाविकास आघाडीने लादलेल्या महावितरणच्या भारनियमन विरोधात भारतीय जनता पक्षाच्यावतीने संगमनेर बस स्थानक चौकात आघाडी सरकारच्या विरोधात रविवारी रात्री कंदील, मेनबत्ती आंदोलन करण्यात आले.
देशात मुबलक प्रमाणात कोळसा उपलब्ध असताना आणि रेल्वे मंत्रालय आवश्यक तेवढ्या वॅगन उपलब्ध करून देत असताना राज्य सरकारच्या नियोजनाअभावी राज्यावर आज भारनियमनाचे संकट ओढावले, लाईट बिलाची वसुली काटेकोरपणे सुरू असताना ग्राहकांकडून सिक्युरिटी डिपॉझीटच्या नावाखाली अतिरिक्त वसुली महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे. परंतु पुर्ण क्षमतेने विजपुरवठा करण्यास महावितरण सक्षम नाही. २०१४ ते २०१९ या काळात माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना राज्यात पुर्ण क्षमतेने विजपुरवठा करून महाराष्ट्र भारनियमनमुक्त केले होते.
मात्र सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील नागरिकांना पुन्हा एकदा अंधारात लोटुन भारनियमन चालू केले आहे. मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या भारनियमनाविरोधात संगमनेरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने कंदील आंदोलन कडून महाविकास आघाडी सरकारला करंट देण्यात आला. सरकार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा यावेळी जाहीर शब्दात भाजपच्या प्रमुख नेत्यांनी निषेध केला.
या आंदोलनात भाजपचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले, माजी शहराध्यक्ष सिताराम मोहरीकर, ओबीसी मोर्चाचे उत्तर नगर जिल्हा सरचिटणीस भारत गवळी, ओबीसी मोर्चाचे उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष दिपक भगत, शहर सरचिटणीस भगवान गिते, किशोर गुप्ता, शहर उपाध्यक्ष सुनील खरे, कैलास भरीतकर, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दिपेश ताटकर, शहर सचिव मनोज जुंदरे, अमित गुप्ता, कार्यालय प्रमुख संतोष पठाडे आदींसह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा