योग्य नियोजनाने टँकरची संख्या घटली मात्र गरज असेल तेथे तातडीने टँकर द्या

संगमनेर : प्रशासकीय भवनात झालेल्या टंचाई आढावा बैठकीत बोलताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात.


महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे प्रशासनाला आदेश

संगमनेर

काही वर्षांपूर्वी या तालुक्यात शंभराहून अधिक पाण्याचे टँकर सुरू होते, मात्र योग्य नियोजनामुळे आता ही संख्या अत्यल्प झाली आहे. यावर्षी कमी झालेल्या पर्जन्यमानामुळे काही भागातून पाण्याच्या टँकरची मागणी येऊ शकते. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने अशा ठिकाणी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहेत.



महसूल मंत्री थोरात यांच्या अध्यक्षतेखाली येथील प्रशासकीय भवनात सर्वच विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पहिलीच टंचाई आढावा बैठक झाली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे, राजेश तिटमे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, पंचायत समितीच्या सभापती सुनंदा जोर्वेकर, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते अजय फटांगरे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


मंत्री थोरात म्हणाले, कमी पर्जन्यमानामुळे संगमनेर तालुक्यातील काही गावांमधील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने येत्या काही दिवसात तेथील पाणी साठ्यातील पाणी संपल्याने, पाण्याच्या टँकरची मागणी केली जाऊ शकते. अशा वेळी प्रशासनाने गावाकडून मागणी होताच तातडीने त्या गावांच्या वाड्या-वस्त्यांना पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावे. जेथून टँकरची मागणी येईल तेथे तातडीने अधिकाऱ्यांनी भेट देऊन परिस्थितीची माहिती करून घ्यावी.


काही वर्षांपूर्वी या तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी मोठ्या प्रमाणात होत असे मात्र दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन केल्याने टँकरची संख्या कमी झाली आहे. तालुक्यातील तलावांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून तातडीने तलाव दुरुस्तीची कामे केली जावी. तसेच ज्या गावांमध्ये रोजगार हमीच्या कामांची मागणी असेल आणि वीस मजूर कामावर येण्यास तयार असतील तेथेही तातडीने रोजगार हमीची कामे सुरू करा.


आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांनी विभागनिहाय खरीप आढावा बैठक घेण्याची परंपरा सुरू केली. आपण कृषिमंत्री असताना महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात खरीप आढावा बैठक घेऊन काम केले. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने लोडशेडिंगचे संकट टाळण्यासाठी वीज खरेदी केली असल्याचे ते म्हणाले.


यावेळी तहसीलदार अमोल निकम यांनी प्रास्ताविक केले तर गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी आभार मानले केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरात 1 कोटी 43 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण

व्यावसायिकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

पंतप्रधान मोदींनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले

एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराची गरज

जिल्हास्तरावर क्रिकेटमध्ये संगमनेरमधील ‘ही’ शाळा ठरली अजिंक्य