जिलेटिनच्या साह्याने शहरालगत एटीएम फोडले  एकोणवीस लाखाची रोकड लंपास


जिलेटिनच्या साह्याने शहरालगत एटीएम फोडले 

एकोणवीस लाखाची रोकड लंपास

संगमनेर : संगमनेर शहरालगत आणि नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या अमृतवाहिनी महाविद्यालया समोरील एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी जिलेटिनचा स्फोट घडवत फोडली आहे. चोरट्यांनी या एटीएममधील तब्बल एकोणवीस लाखाची रोकड घेऊन पोबारा केला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

शहरापासून काही अंतरावर नासिक पुणे महामार्गालगत एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन आहे. हे मशीन जिलेटिनचा स्फोट करून फोडण्यात आले आहे. दरम्यान संगमनेर व परिसरात यापूर्वीदेखील एटीएम मशिन फोडण्याचा अनेक घटना घडल्या आहेत. या एटीएम फुटीचा आणि त्यातून चोरी गेलेल्या रकमेचा शोध लावण्यास पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर चोरटे आता मोठ्या रोकड रकमा असलेले एटीएम मशीन फोडण्यासाठी जिलेटिनचा वापर करू लागले आहेत, हे मध्यरात्रीच्या घटनेतून समोर आले.

अमृतवाहिनी महाविद्यालय ते संगमनेर बस स्थानक यादरम्यान सध्या चौपदरी रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. रस्त्याच्या कामासंदर्भात जिलेटिनचा वापर झाला असावा, असा समज झाल्याने नागरिकांनीदेखील याकडे फारसे गांभीर्याने बघितले नाही. दरम्यान सकाळीच एटीएम पासून काही अंतरावर बँकेचे एटीएम पडलेले असल्याचे लक्षात आल्याने माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांना एटीएम मशीन फोडण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य देखील आढळून आले आहे.

अशाच पद्धतीने काही दिवसांपूर्वी तालुक्यातील समनापुर येथे जिलेटिनचा स्फोट करत एटीएम मशिन फोडण्यात आले होते. त्याचीच पुनरावृत्ती गुरुवारी मध्यरात्रीच्या घटनेत झाली. पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी दोन पथकाद्वारे चोरीचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरात 1 कोटी 43 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

लेखापरीक्षकाला एक वर्षाची कैदेची शिक्षा

मुख्यमंत्र्यांसारखे दिसणे आणि वागणे पडले महागात

असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण

व्यावसायिकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

पंतप्रधान मोदींनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले