दुर्मिळ आणि दुग्धशर्करा योग : एकाचवेळी दोन महत्वाच्या आर्थिक संस्थांवर ‘सोमाणी’ बंधू ...

अनंत पांगारकर | सौ शहरी एक संगमनेरी संगमनेरच्या अर्थकारणात एक महत्त्वपूर्ण दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. व्यावसायिकांसह समाजातील अनेक घटकांच्या उन्नतीला कारणीभूत ठरणाऱ्या दोन महत्त्वाच्या अर्थ संस्थांच्या अध्यक्षपदाची धुरा दोघा भावंडांवर सोपविली गेली आहे. कैलास आणि ओंकार सोमाणी हे दोघे भाऊ अनुक्रमे महेश नागरी आणि संगमनेर मर्चन्ट बँकेचा कारभार बघणार आहे. त्यामुळे संगमनेरच्या अर्थविश्वातील हा दुर्मिळ योग मानला जात आहे.
महेश नागरी सहकारी पतसंस्था आणि संगमनेर मर्चन्ट बँकेसह संगमनेरच्या अर्थकारणात पतसंस्था आणि बँकांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. स्वर्गीय उद्योगपती ओंकारनाथजी मालपाणी (भाऊ) आणि स्वर्गीय मोहनलालजी मनियार यांच्या पुढाकारातून अनुक्रमे महेश नागरी आणि संगमनेर मर्चंट बँक या संस्था उभ्या राहिल्या आहेत. संगमनेरातील अनेक घटकांच्या विशेषतः छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांच्या उन्नतीसाठी या संस्थांचा मोठा हातभार लागला आहे. या संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या आर्थिक बळावर शहरातील अनेक व्यावसायिकांचा व्यवसाय सुरू आहे. समाजातील विविध घटकांना सातत्याने मदतीचा हात देणाऱ्या या संस्था आर्थिकदृष्ट्या संगमनेरच्या अर्थकारणात प्रबळ आणि सक्षम मानल्या जातात. येथील कापड आणि दुचाकी व्यवसायात प्रचंड यश मिळवलेल्या सोमाणी परिवारातील कैलास आणि ओंकार सोमाणी ही भावंडे आपला व्यवसाय सक्षमपणे चालवत असताना संगमनेरच्या समाजकारणात देखील सातत्याने पुढे राहिले आहे. लेखापरीक्षक असलेले कैलास सोमाणी हे महेश नागरी पतसंस्थेच्या कारभारात सक्रिय राहिले आहे, तर राजेंद्र होंडाच्या माध्यमातून व्यवसाय यशस्वीपणे पुढे नेणारे ओंकार सोमाणी शहरातील प्रथितयश आणि अग्रगण्य अशा संगमनेर मर्चंट बँकेच्या संचालकांपैकी सर्वाधिक तरुण सदस्य आहेत. शहरातील प्रतिष्ठित अशा या दोन्ही संस्थांवर संचालक मंडळाने सोमाणी बंधूंना काम करण्याची संधी दिली आहे. आपल्या कार्यकाळात हे दोघे भाऊ या दोन्ही संस्थांना नक्कीच यशोशिखरावर नेतील.
योगेश रहातेकर आणि ज्योती पलोड यांना देखील उपाध्यक्षपदाची संधी अध्यक्षपदावर विराजमान झालेल्या सोमाणी बंधुसह महेश नागरी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी उद्योजक योगेश राहतेकर आणि संगमनेर मर्चन्टच्या उपाध्यक्षपदी महिला संचालक ज्योती पलोड यांना संधी मिळाली आहे. नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांमुळे आर्थिक सक्षम असलेल्या संस्था आणखी बळकट होतील. नवे पदाधिकारी संगमनेरच्या अर्थ विश्वामध्ये आपल्या कामाची चुणूक अधोरेखित करतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरात 1 कोटी 43 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण

व्यावसायिकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

पंतप्रधान मोदींनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले

एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराची गरज

जिल्हास्तरावर क्रिकेटमध्ये संगमनेरमधील ‘ही’ शाळा ठरली अजिंक्य