संगमनेर तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. सुहास आहेर यांची चौथ्यांदा निवड
उपाध्यक्षपदी ॲड. उदयसिंह ढोमसे
महिला उपाध्यक्षपदी ॲड. सौ. सुनंदा वाणी.
संगमनेर | अनंत पांगारकर
संगमनेर तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी शिर्डीच्या साई संस्थानचे विश्वस्त ॲड. सुहास आहेर यांची सलग चौथ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली. तर उपाध्यक्षपदी ॲड. उदयसिंह ढोमसे, व महिला उपाध्यक्षपदी ॲड. सौ. सुनंदा वाणी यांची निवड झाली आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथिगृहावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संगमनेर वकील असोसिएशनमध्ये झालेल्या या बिनविरोध निवडीत अध्यक्षपदी ॲड. सुहास आहेर, उपाध्यक्षपदी ॲड. उदयसिंह ढोमसे महिला उपाध्यक्ष ॲड. सौ सुनंदा वाणी यांच्यासह सेक्रेटरीपदी ॲड. मोहन फटांगरे, सह सेक्रेटरीपदी ॲड. अमोल घुले, खजिनदारपदी ॲड. तात्यासाहेब गुंजाळ, तर सदस्यपदी ॲड. प्रशांत गुंजाळ, ॲड. अविनाश गोडगे, ॲड. किरण रोहम, ॲड. प्रशांत गव्हाणे, ॲड. माया पवार यांची एकमताने निवड झाली आहे.
ॲड. सुहास आहेर हे मागील चार वर्षापासून अध्यक्षपद सांभाळत असून त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून नवीन न्यायालय इमारत उभारणी तसेच त्या ठिकाणी कामकाज स्थलांतरित करणे, वकील बार असोसिएशन करता स्वतंत्र 21 गुंठे जागा मिळवली आहे. तसेच कोरोना संकटामध्ये महाराष्ट्र राज्य बार कौन्सिलकडून संगमनेरकरीता 30 लाख रुपयांचा निधी मिळवला आहे.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्रीताई थोरात, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, महानंद आणि संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, बाबा ओहोळ, ॲड. अरविंद गणपुले, ॲड. बापूसाहेब गुळवे,ॲड. अरुण आहेर, ॲड. डी.आर.वामन, ॲड. संजय दिक्षित, ॲड. अतुल आंधळे, ॲड. सदाशिव थोरात, ॲड. प्रदीप मालपाणी, ॲड. विवेक बोऱ्हाडे, ॲड. नईम इनामदार, ॲड. अशोक हजारे, ॲड. मधुकर गुंजाळ यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
सर्व वकील बंधू भगिनींच्या सहकार्यातून या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सातत्याने बार असोसिएशनच्या हिताचे निर्णय घेतले असून अनेक विकासकामांसाठी पाठपुरावा केला आहे. आगामी काळात वकिलांच्या चेंबरसाठी पाच मजली इमारत उभी करणे, पार्किंग शेड, फर्निचर, याचबरोबर बागबगीच्या यासाठीही आपण पाठपुरावा करणार आहोत.
सुहास आहेर, नवनिर्वाचित अध्यक्ष

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा