विवाहितेच्या खून प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता
विवाहित महिलेच्या अंगावर कोड असल्याच्या कारणातून केला रॉकेल ओतून पेटवून तिच्या हत्येस कारणीभूत ठरणाऱ्या आरोपींची संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्याकडे संगमनेर तालुक्यातील निमोन येथील जनतेचे लक्ष लागले होते.
संगमनेर तालुक्यातील निमोण येथे 9 जुलै 2016 रोजी घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली होती. घटनेतील प्रमुख आरोपी उत्तम मंडलिक याची पत्नी कोमल हिच्या अंगावर कोड असल्याच्या कारणातून पती उत्तम पुंजा मंडलिक याच्यासह विवाहितेचा दीर नवनाथ मंडलिक, जाव शीतल मंडलिक आणि ननंद मीना कैलास चौधरी ज्यांनी विवाहिता कोमल हिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले होते. गंभीर भाजलेल्या कोमल हिचा उपचारादरम्यान नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात 16 जुलैला मृत्यू झाला होता. याप्रकरणी आरोपींच्या विरोधात संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांनी तपास करत संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात चारही आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांच्या न्यायालयासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती. सुनावणीदरम्यान यातील एक महिला आरोपी आणि मयत कोमल हिची ननंद मीना कैलास चौधरी हिचा मृत्यू झाला, त्यामुळे उर्वरित आरोपींविरोधात खटल्याची सुनावणी सुरू होती. न्यायाधीश घुमरे यांच्यासमोर या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला.
आरोपीच्या वतीने काम बघणाऱ्या अँडव्होकेट गोरक्ष कापकर यांनी कोमल हिचा मृत्यू हा स्टोव्हच्या भडक्याच्या अपघाताने झाल्याचा बचाव केला. तसेच कोमल हिचे मृत्यूपूर्व दोन जवाब झाले असून ते परस्परांशी विसंगत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. या जबाबावेळी भाजल्याने जखमी असलेली कोमल ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम नसल्याची बाब त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
सरकार पक्षाचा आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी मयत कोमल हिच्या खुणाच्या आरोपातून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीसाठी 9373098052 या क्रमांकावर संपर्क करा.
तसेच महत्वाच्या घडामोडी च्या बातम्या वाचण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला 75 88 600 950 हा क्रमांक ॲड करावा.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा