संगमनेरजवळ टेम्पो पलटी, दोघे जखमी

 


नाशिक-पुणे मार्गावर माहुली घाटातील घटना


अनंत पांगारकर | संगमनेर


नाशिक-पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील घारगावनजीक माहुली घाटामध्ये मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 


अपघातानंतर घटनास्थळी टेंपो पलटी झाल्याने कणसांनी भरलेली पोती महामार्गावर विखुरलेल्या अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यामुळे सकाळी बराच काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. महामार्गावरील अपघातग्रस्त टेम्पो हटविण्याचे काम सुरू होते.   


अपघाताबद्दल अधिक माहिती अशी, आयशर टेंम्पोचालक बाबासाहेब तातेराव बोडके आणि अर्जुन युवराज गव्हाणे हे कन्नड येथून १२० मक्याच्या कणसांच्या गोण्या घेऊन संगमनेर मार्गे चाकणला जात होते. शुक्रवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ते पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात आले असता अनपेक्षितरीत्या टेम्पो पलटल्याने त्यातील कणसांच्या गोण्या महामार्गावर विखुरल्या गेल्या.


अपघातात टेंम्पोचालक बाबासाहेब तातेराव बोडके आणि अर्जुन युवराज गव्हाणे जखमी झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रशासनाने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.


नाशिक-पुणे मार्गाच्या चौपदरीकरणानंतर देखील संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या या मार्गावरील अपघात कमी झालेले नाहीत. गेल्या काही दिवसापासून या मार्गावर अपघाताच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरात 1 कोटी 43 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण

व्यावसायिकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

पंतप्रधान मोदींनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले

एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराची गरज

जिल्हास्तरावर क्रिकेटमध्ये संगमनेरमधील ‘ही’ शाळा ठरली अजिंक्य