संगमनेर नगरपालिकेला हवे नोटा मोजण्याचे मशीन

मुख्याधिकार्‍यांनी काढली नोटा मोजण्याच्या मशीनसह अन्य कामाची निविदा


अनंत पांगारकर | संगमनेर

संगमनेर नगर परिषदेला नोटा मोजण्यासाठी मशीनची गरज असून त्यासाठीची निविदा मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी काढली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पालिकेत जमा होणारा कर रूपातील पैसा आता मशीनच्या सहाय्याने मोजला जाणार आहे.




राज्यातील नगरपरिषदेच्या विविध कामांसाठी निविदा काढत असतात अशीच एक निविदा संगमनेर नगरपरिषदेने काढली असून एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली ही निविदा चर्चेचा विषय ठरली आहे. कोरोना महामारीमुळे सर्वत्र आर्थिक मंदी जाणवत असताना देखील संगमनेर नगर परिषदेला नोटा मोजण्यासाठी मशीनची गरज भासत आहे. यामुळे पालिकेच्या उत्पन्नात मोठी आर्थिक वाढ झाल्याचा निष्कर्ष नागरिक काढत आहे.

नोटा मोजण्याच्या मशीनसह राष्ट्रध्वज पुरविणे, कार्यालयीन वापरासाठी फिरणाऱ्या खुर्च्या, फायबर खुर्च्या, हरित संगमनेरसाठी हातभार लावणाऱ्या वृक्षांसाठी ट्री गार्ड आधी कामाची निविदा मुख्याधिकारी वाघ यांनी काढले असून ती वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली यातील नोटा मोजण्याच्या मशीनची उत्सुकतेने चर्चा शहरात सुरू आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरात 1 कोटी 43 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण

व्यावसायिकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

पंतप्रधान मोदींनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले

एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराची गरज

जिल्हास्तरावर क्रिकेटमध्ये संगमनेरमधील ‘ही’ शाळा ठरली अजिंक्य