भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने राज्य सरकारच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये लाक्षणिक उपोषण

अनंत पांगारकर | संगमनेर 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुर्तता करून मध्यप्रदेश सरकारने ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण टिकवले परंतु महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुर्तता न करता वेळकाढूपणा करत ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण घालवले. ओबीसी समाजाचा राजकीय घात करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपा ओबीसी मोर्चा, संगमनेरच्यावतीने संगमनेर प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने १३ डिसेंबर २०१९ रोजी राज्य सरकारला ट्रिपल टेस्ट करून इंपेरीकल डेटा न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी आयोग स्थापन करण्याच्या सुचना न्यायालयाने राज्य सरकारला दिल्या होत्या. परंतु राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यासच उशीर केला आणि आयोगाला निधी उपलब्ध करुन दिला नाही म्हणून महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण न्यायालयाने रद्द केले.

मध्यप्रदेश सरकारने न्यायालयाच्या आदेशानुसार ट्रिपल टेस्ट करून इंपेरीकल डेटा न्यायालयात वेळेत सादर केला परिणामी मध्यप्रदेशात ओबीसींचे गेलेले राजकीय आरक्षण पुनःस्थापित होऊ शकले. महाराष्ट्रात ओबीसींच्या रद्द झालेल्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी ठाकरे-पवार सरकार असल्याचा घणाघात यावेळी बोलताना ओबीसी मोर्चाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर यांनी केला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव नंदकुमार जेजुरकर, ओबीसी मोर्चा संगमनेर तालुका अध्यक्ष ॲड गोरक्ष कापकर, उत्तर नगर जिल्हा सरचिटणीस भारत गवळी, उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष दिपक भगत, संगमनेर शहर अध्यक्ष संपत गंलाडे, भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहर अध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले, तालुका सरचिटणीस वैभव लांडगे, शहर सरचिटणीस आणि माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार, व्यापार आणि उद्योग आघाडीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष शिरीष मुळे, किसान मोर्चाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सतिश कानवडे, तालुका सरचिटणीस भरत फटांगरे, शहर सरचिटणीस भगवान गितेसंजय नाकील, शहर उपाध्यक्ष कैलास भरीतकर, माजी शहराध्यक्ष सिताराम मोहरीकर, शहर उपाध्यक्ष सुनिल खरेकांचनताई ढोरे, शहर सचिव मनोज जुंदरे, राहुल भोईर, दिलीप रावळ, युवा मोर्चा शहर अध्यक्ष दिपेश ताटकर, अभियंता आघाडीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष हरीश चकोर, ओबीसी मोर्चाचे उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव खेमनर, उत्तर नगर सचिव शिवकुमार भंगिरे, ओबीसी मोर्चाचे संगमनेर शहर उपाध्यक्ष भगवान कुक्कर, संगमनेर शहर सरचिटणीस बालाजी लालपोतु, प्रशांत वाडेकर, राहाता तालुकाध्यक्ष स्वानंद रासने, राहाता तालुका भाजपा ओबीसी युवा मोर्चा अध्यक्ष जितेंद्र माळवदे, शहर उपाध्यक्ष शाम कोळपकर, संपत गेठे, नवनाथ वावरे, कोंडाजी कडनर, अशोकराव कानवडे, बुवाजी खेमनर, पप्पु तेजी, शाम कासार, साहेबराव वलवे, ॲड. संदिप जगनर, संतोष भालसिंग, कार्यालय प्रमुख संतोष पठाडे, विकास गुळवे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरात 1 कोटी 43 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण

व्यावसायिकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

पंतप्रधान मोदींनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले

एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराची गरज

जिल्हास्तरावर क्रिकेटमध्ये संगमनेरमधील ‘ही’ शाळा ठरली अजिंक्य