दिव्यक्रांतीचा आदर्श समाज भूषण पुरस्कार संगमनेरचे वकील उदयसिंह ढोमसे पाटलांना ...
संगमनेर | अनंत पांगारकर
पुण्याच्या दिव्य क्रांती सोशल फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा आदर्श समाज भूषण गौरव पुरस्कार संगमनेरमधील वकील आणि बार असोसिएशनचे उपाध्यक्ष उदयसिंह ज. ढोमसे पाटील यांना मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये प्रदान करण्यात आला.
फाउंडेशनच्यावतीने यावर्षीच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये संगमनेरमधून ढोमसे पाटील यांचा समावेश होता. पुण्यात आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुर्यादत्ता एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी बेळगाव येथील विक्रम शिंगाडे उपस्थित होते.
ढोमसे पाटील हे अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि संघटनांशी संलग्न आहेत. विरंगुळा फाउंडेशनच्या माध्यमातून अनाथ मुले, पीडित महिला यांच्याकरिता त्यांचे विशेष योगदान राहिले आहे. तसेच त्यांचे संगमनेर वकील संघाचे नुकतेच सलग चौथ्यांदा उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. वकील संघाचे उपाध्यक्ष म्हणून काम बघणाऱ्या ढोमसे यांनी या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.कोरोना साथीच्या कालखंडात त्यांनी केलेले काम विशेष उल्लेखनीय ठरले. अनेक सहकारी संस्थांशी ते जोडलेले आहेत.
या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
-----–-–-–
आपल्या बातम्या जाहिरातीसाठी 9373928052 या क्रमांकावर संपर्क करा



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा