बिगुल वाजला : अशी आहे संगमनेरची गट-गण रचना

एका गटाची तर दोन गणांची वाढ

जिल्ह्यातील सर्वाधीक सदस्य संख्या असल्याने जिल्हा परिषदेवर संगमनेरचे वर्चस्व वाढणार


अनंत पांगारकर : संगमनेर

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट व गणांची प्रारुप रचना जाहीर केली आहे. झिकझॅक पध्दतीने झालेल्या गट, गणांच्या रचनेत तोडफोड करण्यात येऊन नव्याने एका गटाची व दोन गणांची संगमनेरमध्ये भर पडली. त्यामुळे नव्याने होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर गट, गणांच्या तोडफोडीमुळे इच्छुकांत यामुळे “कही खुशी कही गम” असे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या ८५ गट व पंचायत समितीच्या १७० गणांचा आराखडा (ता. ९) राज्य निवडणूक आयुतांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने महसूल विभागाने सादर केला होता. जिल्ह्यात नवीन १२ गट व २४ गण वाढल्याने आपण नेमके कोणत्या गटात आहोत, याची उत्सुकता जिल्ह्यातील इच्छुकांना लागली होती. प्रारुप आराखडा जाहीर झाल्याने आता इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. 
८ पर्यंत हरकती; २७ ला अंतिम रचना 
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रारुप प्रभाग रचनेवर नागरिकांच्या हरकती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे ८ जून २०२२ पर्यंत सादर कराव्यात. आलेल्या हरकतींवर सुनावणी होऊन विभागीय आयुक्तांकडून २२ जूनला गट-गण रचना अंतिम केली जाणार असून २७ जूनला अंतिम गट-गण रचना प्रसिद्ध होणार असल्याची माहिती संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व तहसिलदार अमोल निकम यांनी दिली. 
नव्याने जाहीर करण्यात आलेल्या प्रारुप आराखड्यातील संगमनेरमधील गट व गणांची नांवे खालीलप्रमाणे :

गटाचे नांव              गणाचे नांव

समनापुर               निमोण
                      समनापुर
तळेगांव               तळेगांव
                     कोकणगांव
आश्वी बुद्रुक      आश्वी बुद्रुक
                     आश्वी खुर्द
जोर्वे                      जोर्वे
                     अंभोरे
संगमनेर खुर्द      वडगांव पान
                     संगमनेर खुर्द
घुलेवाडी              घुलेवाडी
                     गुंजाळवाडी
धांदरफळ बुद्रुक      राजापुर
                     धांदरफळ बुद्रुक
चंदनापुरी              चंदनापुरी
                     पेमगिरी
साकूर              वरवंडी
                     साकूर
बोटा                      खंदरमाळवाडी
                     बोटा





गट आणि गणातील समाविष्ठ गावांची नांवे

समनापुर : निमोण, नान्नजदुमाला, पारेगांव बुद्रुक, पळसखेडे, पिंपळे, क-र्हे, सोनेवाडी, पारेगांव खुर्द, सोनोशी
समनापुर, सुकेवाडी, कुरण, मालदाड, पोखरी हवेली, खांजापुर

तळेगांव : तळेगाव, आरामपुर, अजमपुर, जुनेगाव, हसनाबाद, चिंचोली गुरव, लोहारे, कासारे, देवकौठे, वडझरी बुद्रुक, काकडवाडी, वडझरी खुर्द, तिगाव
कोकणगांव, शिवापुर, मनोली, कौठे कमळेश्वर, निळवंडे, मेंढवण, मिरपुर, कोंची, मांची, करुले

आश्वी बुद्रुक : आश्वी बुद्रुक, निमगांव जाळी, चिंचपुर बुद्रुक, चिंचपुर खुर्द, उंबरी, बाळापुर, सादतपुर, औरंगपुर, 
आश्वी खुर्द, पिंप्री लौकी अजमपुर, खळी, दाढ खुर्द, चणेगाव, झरेकाठी, प्रतापपुर

जोर्वे :  जोर्वे, पिंपरणे, कनोली, रहीमपुर, जाखुरी, खराडी, ओझर खुर्द, कनकापुर
अंभोरे, पानोडी, शिबलापुर, कोळवाडे, शेडगांव, मालुंजे, ओझर बुद्रुक, हंगेवाडी

संगमनेर खुर्द : वडगाव पान, कोल्हेवाडी, रायतेवाडी, देवगाव, रायते, वाघापुर, माळेगाव हवेली, निंभाळे, निमगाव टेंभी, शिरापुर
संगमनेर खुर्द, वैदुवाडी, निमज, हिवरगांव पावसा, खांडगाव, झोळे

घुलेवाडी : घुलेवाडी 
गुंजाळवाडी, ढोलेवाडी, वेल्हाळे, सायखिंडी

धांदरफळ बुद्रुक :  राजापुर, जवळेकडलग, कासारा दुमाला, चिकणी, निमगाव भोजापुर
धांदरफळ बुद्रुक, वडगाव लांडगा, चिखली, पिंपळगाव कोंझिरा, कोकणेवाडी, मंगळापुर, कौठे धांदरफळ, सांगवी

चंदनापुरी : चंदनापुरी, गाभणवाडी, पिंपळगाव देपा, खंडेरायवाड, मोधळवाडी, सावरगाव तळ, डोळासणे, बांबळेवाडी, पोखरी बाळेश्वर, कर्जुले पठार, गुंजाळवाडी पठार, पिंपळगाव माथा
पेमगिरी, निमगाव बुद्रुक, नांदुरी दुमाला, धांदरफळ खुर्द, गोडसेवाडी, सावरचोळ, मेंगाळवाडी, निमगांव खुर्द, मिर्झापुर, शिरसगाव, धुपे.

साकूर : वरवंडी, कुंभारवाडी, चौधरवाडी, मांडवे बुद्रुक, खांबे, डिग्रस, शिंदोडी, खरशिंदे, कणसेवाडी, रणखांबवाडी, कौठे मलकापुर, दरेवाडी
साकूर, जांभुळवाडी, नांदुर खंदरमाळ, जांबुत बुद्रुक, जांबुत खुर्द, हिवरगाव पठार, बिरेवाडी, शेंडेवाडी

बोटा : खंदरमाळवाडी, आंबी खालसा, कौठे बुद्रुक, सारोळे पठार, जवळे बाळेश्वर, कौठेवाडी, सावरगाव घुले
बोटा, माळवाडी, केळेवाडी, अकलापुर, आभाळवाडी, शेळकेवाडी, येलखोपवाडी, घारगांव, आंबी दुमाला, भोजदरी, पेमरेवाडी, कुरकुटवाडी, कुरकुंडी, म्हसवंडी.

_______________________

निवडणुकीचे बिगुल वाजताच इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. तर भारतीय जनता पक्षाकडून राजकीयदृष्ट्या महत्वपुर्ण मानल्या जाणाऱ्या तळेगाव गटातून संगमनेर मधील नामांकित वकील आणि भाजपचे ओबीसी मोर्चाचे संगमनेर तालुका अध्यक्ष गोरक्ष कापकर यांना उमेदवारी देण्याची मागणी होत आहे. कापकर हे संगमनेर न्यायालयात वकील असून सामाजिक कामात देखील ते अग्रेसर असतात. विविध वृत्तपत्रातून त्यांचे लिखाण दखील नेहमी प्रसिद्ध होत असते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरात 1 कोटी 43 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण

व्यावसायिकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

पंतप्रधान मोदींनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले

एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराची गरज

जिल्हास्तरावर क्रिकेटमध्ये संगमनेरमधील ‘ही’ शाळा ठरली अजिंक्य