इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंटपदी वृषाली कडलग तर ज्योती पलोड सेक्रेटरी
संगमनेर :-
येथील स्वार्थ विरहित सेवेच्या माध्यमातून लोकप्रिय असलेल्या इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंटपदी वृषाली कडलग यांची तर सेक्रेटरीपदी ज्योती पलोड यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती मावळत्या प्रेसिडेंट डॉ. दिपाली पानसरे यांनी दिली आहे.
इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या नूतन पदाधिकऱ्यांचा पदग्रहण समारंभ १८ रोजी मालपाणी हेल्थ क्लब , संगमनेर येथे सायंकाळी ६ वाजता समारंभपूर्वक आयोजित करण्यात आला असून त्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून इनरव्हील जिल्हा ३१३ च्या चेअरमन मुक्ती पानसे, संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे , जिल्हा ३१३ च्या व्हॉईस चेअरमन रचना मालपाणी उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी इनरव्हील क्लब तर्फे धांदरफळ येथील इयत्ता आठवी ते दहावी या वर्गात शिकणाऱ्या ११ गरजू विद्यार्थिनींना शाळेत येणे सुकर होण्यासाठी मोफत सायकली देण्यात येणार असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्षा वृषाली कडलग यांनी दिली.
क्लबची कार्यकारिणी खालील प्रमाणे -
प्रेसिडेंट वृषाली कडलग, सेक्रेटरी ज्योती पलोड, व्हॉईस प्रेसिडेंट डॉ. श्रद्धा वाणी , आय .पी .पी . डॉ. दिपाली पानसरे, खजिनदार सुनीता गाडे, आय. एस. ओ. स्मिता मालानी, संपादक वैशाली खैरनार, समन्वयक भावना नावंदर, सह समन्वयक नेहा सराफ, संचालक ज्योती कासट, शिल्पा नावंदर, मंजू मणियार, स्वाती पडतानी, विजया शिंदे.
इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरने संगमनेर तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपले महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. यावर्षी वृक्षारोपनाव्दारे पर्यावरण संवर्धनासाठी क्लब आपले योगदान देईल असे सेक्रेटरी ज्योती पलोड यांनी सांगितले.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा