शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरील कारवाई विरोधात संगमनेरात निदर्शने

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ई.डी.मार्फत चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात संगमनेर शिवसेनेचे निदर्शने! संगमनेर शिवसेनेचे फायरब्रँड प्रवक्ते व भाजपा विरोधात उघडपणे भूमिका घेणाऱ्या संजय राऊत यांच्यावर ई.डी.ने कारवाई करत त्यांना अटक केली असल्याच्या पार्शभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे नाना यांच्या नेतृत्वात जिल्हाभरात आंदोलन व निदर्शने करण्यात आले.
संगमनेर येथे झालेल्या आंदोलनात तीव्रपणे आपले मत व्यक्त करतांना खेवरे म्हणाले "महाविकास आघाडी सरकार घडवण्यासाठी विशेष भूमिका निभावलेले शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपा व केंद्रसरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे, विरोधकांवर मुद्दाम खोटे आरोप करून केंद्रीय यंत्रणा हाताशी वापरून भाजपा देशभरात हे कृत्य करत आहे भविष्यात जनताच याला उत्तर देईल. या आधी देखिल भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी आरोप केलेल्या इतर पक्षातील नेत्यांना भाजप प्रवेशा नंतर क्लीन चिट कशी मिळते हा देखिल विचार करण्याचा विषय आहे." असे आंदोलकांनी म्हटले आहे.
संगमनेर बस स्थानक परिसरात झालेल्या आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे शिवसेना तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवत घोषणाबाजी केली व किरीट सोमय्या यांचा फोटो जाळण्यात आला. यावेळी शिवसैनिकांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ईडी च्या कारवाईचा तीव्र घोषणाबाजी करत निषेध केला. या प्रसंगी माजी उपजिल्हा प्रमुख दिलीप साळगट, शहरप्रमुख प्रसाद पवार, शिवसेना कामगार सेना जिल्हाप्रमुख मुजीब शेख, नागपूर संपर्कप्रमुख नरेश माळवे, जयवंत पवार, उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, विकास डमाळे, दीपक वनम, वेणुगोपाल लाहोटी, सचिन साळवे, रयुवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवा सेना शहर प्रमुख अमोल डुकरे, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, संदीप राहणे, वैभव अभंग, संभव लोढा, शिवसेना सचिव प्रथमेश बेल्हेकर, कायार्ध्यक्ष दीपक साळुंखे, संघटक पप्पू कानकाटे, सुदर्शन इटप, गोविंद नागरे, संकेत घोडेकर, अपंग सेना जिल्हाप्रमुख जालिंदर लहांमगे, शहर समन्वयक भाई तांबोळी, आजीज मोमीन, त्रिलोक कतारी प्रशांत खजुरे, माधव फुलमाळी, अकोल्याचे नितीन नाईकवाडी, माधवराव रावते, तसेच शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख मंगल घोडके, सुरेखा गुंजाळ, आशा केदारी आदींसह संगमनेर-अकोलेती शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरात 1 कोटी 43 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण

व्यावसायिकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

पंतप्रधान मोदींनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले

एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराची गरज

जिल्हास्तरावर क्रिकेटमध्ये संगमनेरमधील ‘ही’ शाळा ठरली अजिंक्य