वसंत लाॅन्स व संगमनेरी तांडवच्या वतीने "वसंतोत्सव दही हंडी उत्सव"
संगमनेर / अनंत पांगारकर
येथील सामाजिक व धार्मिक क्षेत्रात नेहमी सक्रिय योगदान देणारे माजी नगरसेवक गोरख कुटे यांच्या 'वसंत लाॅन्स' व 'संगमनेरी तांडव' ढोलताशा यांच्यावतीने नगररोडवरील वसंत लाॅन्स येथे "वसंतोत्सव दही हंडी उत्सव" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत हवेत तिरंगी फुगे सोडून हा आगळावेगळा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सुकेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा व शुक्लेश्वर विद्यालय सुकेवाडीच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर करीत कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याचबरोबर संगमनेरी तांडव ढोलताशा पथकाने आपल्या जादुई वादनाने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
यावेळी गोरख कुटे, सत्यजित तांबे व जयश्रीताई थोरात यांनी संगमनेरी ढोलताशा तांङवाच्या कार्यक्रमात सहभाग घेतल्याने या कार्यकमाची उंची वाढत गेली. संगमनेरी तांडव या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिड्डी व त्यांच्या सहकार्यांनी अतिशय सुंदर ढोलताशाचे वादन सादर केले. यावेळी व्हायब्रेशन साउंड सिस्टीम व राजकमल बॅंडने गोविंदा पथकाला सलामी दिली. त्यानंतर गोविंदा पथकाने तीन थर लावून ही दही हंडी फोडली.
या दिमाखदार सोहळ्यासाठी राजहंस दुध संघाचे संचालक लक्ष्मणराव कुटे, सुकेवाडीचे उपसरपंच सुभाष कुटे, छावा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष खंडू सातपुते, अरूण ताजणे, इंजि. के. के. थोरात, सोन्याबापु सातपुते, विलास सातपुते, दादा खतोडे, निखील पापडेजा, निवृत्ती सातपुते, वैभव महाले, अमोल कुटे, सोपान अरगडे, सचिन खतोडे, भिमाशंकर सातपुते, बाळासाहेब सातपुते, मंगेश सातपुते, अरुण शेटे, भारत पडवळ, नानासाहेब कुटे, सचिन सातपुते, भगवान सातपुते यांच्यासह अनेक गोविंदा पथक, विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
'सौ शहरी एक संगमनेरी'च्या बातम्या मिळविण्यासाठी 7588600950 हा मोबाईल क्रमांक तुमच्या Whats app ग्रुपमध्ये समाविष्ठ करा





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा