पोस्ट्स

माहिती टाळण्यासाठी जनमाहिती अधिकारी नाचवितात कागदी घोडे

इमेज
  विश्लेषण । अनंत पांगारकर माहिती टाळण्यासाठी जनमाहिती अधिकारी नाचवितात कागदी घोडे संगमनेर  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहिती अधिकाराचे उत्तम शस्त्र नागरिकांना मिळवून दिले. मात्र माहिती अधिकाराचा दुरुपयोग होत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत असतांना यातुन अनेक चुकीच्या गोष्टीदेखील समोर येण्यास पर्यायाने चुकीच्या कामांवर वचक निर्माण होण्यास मदत झाली. आता मात्र एक नवीनच प्रकार समोर येत आहे. जन माहिती अधिकारीच माहिती टाळण्यासाठी अर्जदारास कागदी घोडे नाचवत नकारघंटा देत असल्याचे समोर येत आहे. अर्जदारांना माहिती देण्यासाठी जनमाहिती अधिकारी विविध कारणे पुढे करत असल्याने माहिती अधिकाराच्या शश्त्राची धार कमी होत चालली आहे.  माहिती अधिकार कायदा २००५ मध्ये लागु झाल्यानंतर एक मोठे शस्त्र जनतेच्या हाती लागले होते. यातुन अनेक प्रकारची माहितीदेखील समोर आली. नंतरच्या काळात अनेक ठिकाणी निर्माण झालेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांपैकी काही कार्यकर्त्यांनी या कायद्याचा दुरुपयोगदेखिल केल्याचे प्रकार घडले. त्यामुळे माहिती मागणाऱ्या सर्वांकडेच संशयाने अधिकारी बघु लागले. काही ठराविक लोकां...

जिल्हा परिषदेसाठी नव्याने आणखी एका गटाची भर सर्वाधिक १० गट संगमनेरात

इमेज
  जिल्हा परिषदेसाठी नव्याने आणखी एका गटाची भर सर्वाधिक १० गट संगमनेरात  अनंत पांगारकर संगमनेर :   नव्याने होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गटांची पुनर्रचना करण्यात आली आहे. यात संगमनेरमध्ये आणखी एका गटाची भर पडली आहे. गटांच्या तोडफोडीत गावे विभागली गेल्याने इच्छुकांची चांगलीच संभ्रमावस्था वाढली आहे. नव्याने तयार होणारी यादी समाजमाध्यमावर फिरत असुन या यादीनुसार आता पुन्हा इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. आता संगमनेरमध्ये जिल्हा परिषदेचे १० गट असतील. जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्यांची एकाच तालुक्यातील ही सर्वाधिक संख्या असेल. २०११ ची लोकसंख्या विचारात घेऊन या गटांची पुनर्रचना करण्यात आली आहे. संगमनेरमध्ये यापु्र्वी जिल्हा परिषदेचे ९ गट होते. यात समनापुर, वडगाव पान, आश्वी बुद्रुक, जोर्वे, घुलेवाडी, धांदरफळ बुद्रुक, संगमनेर खुर्द, बोटा व साकुर या गटांचा समावेश होता. यातील आश्वी बुद्रुक गट वगळता उर्वरीत सर्व गटांवर राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व होते. तर आश्वी या गटातुन आमदार राधाकृष्ण विखे यांच्या समर्थक निवडून आल्या हो...

चौपदरीमुळे संगमनेरचे सौदर्यदेखील चकाकणार

इमेज
चौपदरीमुळे संगमनेरच े सौदर्यदेखील चकाकणार विश्लेषण । अनंत पांगारकर   संगमनेर : चेहऱ्याचे सौदर्य दाखविण्याचे काम आरसा करत असतो . त्याचप्रमाणे एखाद्या शहराचे सौदर्य दाखविण्याचे काम आरश्याच्या रुपाने गावातील रस्ते आणि इमारती करत असतात . संगमनेरचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सध्या शहराबाहेर सुरु असलेल्या रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे होत आहे . काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये प्रवेश करायचा अथवा संगमनेरमधुन पुढे जायचे म्हटले तर शहरातील वाहतुक कोंडीमुळ नाकीनऊ येत . शहरात प्रवेश करतांनाच हतबल अवस्था झालेली व्यक्ती शहरातील अंतर्गत रस्त्यामुळे आणखीनच त्रस्त होत असे . जुन्या गावठाणातील रस्त्यांची अडचण सोडली तर शहरातील रस्त्यांचा हा प्रश्न आता खुप अंशी मार्गी लागला आहे . त्यामुळे शहराचे सौदर्यदेखील चकाकु लागले आहे .               प्रवरा नदीवरील पुल , तीन बत्ती चौक , पंचायत समिती रस्ता , कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर , बसस्थानक चौक , अकोले नाका ही शहरातील प्रवेशद्वारे वाहतुकीच्या कोंडीची ठिकाणी म्हणुन परिचित होती . या ठिकाणच्या वा...

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराची घोषणा डॉ. आ. ह. साळुखे यांना थोरात तर डॉ. सुधीर भोंगळे यांना शिंदे स्मृती पुरस्कार

इमेज
  सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ . अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराची घोषणा डॉ . आ . ह . साळुखे यांना थोरात तर डॉ . सुधीर भोंगळे यांना शिंदे स्मृती पुरस्कार   संगमनेर : सहकारातील दीपस्तंभ व दंडकारण्य अभियानाचे प्रणेते , सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या नांवाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ विचारवंत , लेखक डॉ . अण्णासाहेब हरी साळुंखे यांची तर कृषीक्रांतीचे प्रणेते डॉ . अण्णासाहेब शिंदे यांच्या नांवाने दिल्या जाणाऱ्या स्मृती पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार , लेखक व कृषी तज्ज्ञ डॉ . सुधीर भोंगळे यांची निवड करण्यात आली आहे . प्रत्येकी १ लाख रुपये रोख व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे . आमदार डॉ . सुधीर तांबे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली .                 सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमीत्ताने थोरात कारखान्याच्या प्रेरणास्थळी आयोजित अभिवादन सभेत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली . ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर , नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे , कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओ...

माझ्या स्मृति पटलावरील दादा... तीर्थरूप भाऊसाहेब थोरात

इमेज
माझ्या स्मृति पटलावरील दादा... तीर्थरूप भाऊसाहेब थोरात नक्की दिवस आठवत नाही. मात्र ते २००६ साल होते. माझे शिक्षण सुरू असतानाच मी संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहामध्ये रात्रपाळीत काम करत होतो. माझ्या कामाच्या दहा-बारा दिवसातच अतिथी गृहामध्ये जनरल शीपमध्ये काम करणाऱ्या मुलांना बाहेर कुठेतरी कामानिमित्ताने जायचे होते. त्यावेळी कारखाना गेस्ट हाऊचे इन्चार्ज थिटमे साहेब यांनी मला सांगितले की तुला नाईट करून पुन्हा उद्या जनरल ड्युटी करायची आहे. मी होकार दिला. मी रात्रपाळी करून दिवसपाळी करण्यासाठी तयार होतो. सकाळचे साडेनऊ वाजले होते, तोच एका गाडीचा हाॅर्नचा आवाज कानावर आला. ताबडतोब मी गाडीच्या जवळ गेलो आणि गाडीचा दरवाजा उघडला. गाडीतून त्यावेळी एक गृहस्थ खाली उतरले ते दादा म्हणजेच भाऊसाहेब थोरात. प्रथमत:च त्यांना पाहत होतो. त्यावेळी दादांकडे सफेद कलरची अम्बेसिटर गाडी होती. तसेच दादांचे ऑफीस हे कारखान्याच्या अतिथीगृहातच होते. दादा ज्या ठिकाणी बसायचे त्या ठिकाणी आतमध्ये प्रवेश करताना समोरच माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे यांचा अतिशय सुंदर बोलका उभा असा फोटो लावलेला होता. गाडी...

राजकारणात न रमलेला मात्र समाजकारणात क्रांती घडविणारा माणूस

इमेज
राजकारणात न रमलेला मात्र समाजकारणात क्रांती घडविणारा माणूस अनंत पांगारकर  पत्रकार दैनिक पुण्यनगरी  सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात संगमनेर चा सामाजिक राजकीय पटलावरील एक सुवर्णपान. सहकारातील या दिग्गज नेत्यांची ओळख आदरार्थी दादा म्हणून सर्वपरिचित आहे. त्यांचा आज ९८ वा जन्म दिवस. ही थोर विभूती आज आपल्यात नसली तरी त्यांच्या स्मृती मात्र आपल्यासोबत चिरंतन आहेत. संगमनेरच्या समाजकारणात या माणसाने मोठी क्रांती घडविली. आजचा संगमनेरचा समृद्ध सहकार ही दादांचीच देण. या महात्म्याने दुष्काळी भागात आमूलाग्र क्रांती घडविली. सहकाराच्या माध्यमातून येथे उभ्या राहिलेल्या संस्थांच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना रोजगार मिळाला. येथील शेती बहरली. कुटुंबांसह तालुका समृद्ध झाला. संगमनेरची ओळख राज्यात विकसनशील शहरांमध्ये होऊ लागली. भविष्याचा वेध घेत दूरदृष्टीने समाजकारणाला समृद्धीच्या वाटेवर नेणारा हा महात्मा जर राजकारणात रमला असता तर आजच्या जिल्हा व राज्याच्या राजकारणाची दिशा निश्चितच आणखी वेगळी दिसली असती.  वाचनातून माणूस समृद्ध होतो असे म्हणतात दादांच्या बाबतीतही असेच काहीसे झालेले. विद्यार...

महसूल मंत्री थोरात यांच्या कार्याचा डंका वाजवायलाच हवा; पण वाजविणार कोण? ज्या कार्यकर्त्यांकडून अपेक्षा ते भलत्याच कामात व्यस्त

विश्लेषण | अनंत पांगारकर   महसूल मंत्री थोरात यांच्या कार्याचा डंका वाजवायलाच हवा ;  पण वाजविणार कोण ? ज्या कार्यकर्त्यांकडून अपेक्षा ते भलत्याच कामात व्यस्त   संगमनेर:   संगमनेरच्या राजकारणाला एक चांगली परंपरा आहे. संगमनेरकरांचे लोक प्रतिनिधीत्व करण्याची संधी देखील आत्तापर्यंतच्या आमदारांना दीर्घकाळ मिळाली आहे. या सर्वांनीच राज्याच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. संगमनेरच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचे काम सध्याचे लोकप्रतिनिधी आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात करत आहेत. संगमनेरकरांच्या या नेतृत्वाची कामगिरी राज्यात सरस ठरत असली तरी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा डंका वाजविण्यात स्थानिक कार्यकर्ते मात्र सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळेच संगमनेरात येणारे राज्यातील व देशातील नेते थोरात यांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना त्यांचे काम कार्यकर्त्यांनी पुढे नेले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करताना दिसतात.   वर्षाच्या सरतेशेवटी संगमनेर नगरपरिषदेच्या सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण ,  भूमिपूजन आणि उद्घाटनासाठी राज्याच्या शिक्षण म...