पोस्ट्स

या.. मला अटक करा, शिवसेना खासदार संजय राऊत कडाडले

इमेज
 मुंबई : हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्वीकारणार नाही. या.. मला अटक करा ! जय महाराष्ट्र! असे ट्विट करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले आहे. शिवसेना नेते आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील मोठ्या गटाने वेगळा गट स्थापन करत सरकारचा पाठिंबा काढल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली असताना राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ आणि प्रवीण राऊत प्रकरणी मंगळवारी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहे. ईडीच्या या नोटीसला राऊत यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे. ट्विटमध्ये राऊत म्हणाले, मला आत्ताच समजले ईडीने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळेच बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत मला रोखण्यासाठी.. हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही. या.. मला अटक करा! जय महाराष्ट्...

सावरगावतळ येथील जेष्ठ नागरिकाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू..

इमेज
  संगमनेर:-  तालुक्यातील सावरगावतळ येथील सोपान मारुती नेहे वय 65 वर्ष या जेष्ठ नागरिकाचा शेततळ्यात बुडून  मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी पहाटे 5.30 वाजेच्या दरम्यान घडली. सावरगावतळ येथे गट नं  655 मध्ये त्यांचे स्वतःच्या मालकीचे  शेततळे आहे. शुक्रवारी पहाटे 5.30 च्या दरम्यान ते पाण्यासाठी  आपली मोटार चालू करण्यासाठी गेले असता कागदावरून पाय घसरून ते शेततळ्यात पडले. पहाटेची वेळ आणि जवळपास कोणीही नसल्याने आणि त्यांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोटार चालू करून बराच वेळ होऊनही ते घरी पुन्हा माघारी का येईना म्हणून त्यांचा मुलगा बाबासाहेब त्यांना पाहण्यासाठी गेला असता ते शेततळ्यात पडल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी आजूबाजूच्या व्यक्तींना मदतीला बोलाविले असता वैभव नेहे आणि इतर ग्रामस्थ मदतीला धावून आले आणि तात्काळ त्यांना पाण्यातून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी येथे उपचारासाठी नेत असतांनाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही माहिती गावचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांना समजली असता पोलीस पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी ज...

बिगुल वाजला : अशी आहे संगमनेरची गट-गण रचना

इमेज
एका गटाची तर दोन गणांची वाढ जिल्ह्यातील सर्वाधीक सदस्य संख्या असल्याने जिल्हा परिषदेवर संगमनेरचे वर्चस्व वाढणार अनंत पांगारकर : संगमनेर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट व गणांची प्रारुप रचना जाहीर केली आहे. झिकझॅक पध्दतीने झालेल्या गट, गणांच्या रचनेत तोडफोड करण्यात येऊन नव्याने एका गटाची व दोन गणांची संगमनेरमध्ये भर पडली. त्यामुळे नव्याने होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर गट, गणांच्या तोडफोडीमुळे इच्छुकांत यामुळे “कही खुशी कही गम” असे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या ८५ गट व पंचायत समितीच्या १७० गणांचा आराखडा (ता. ९) राज्य निवडणूक आयुतांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने महसूल विभागाने सादर केला होता. जिल्ह्यात नवीन १२ गट व २४ गण वाढल्याने आपण नेमके कोणत्या गटात आहोत, याची उत्सुकता जिल्ह्यातील इच्छुकांना लागली होती. प्रारुप आराखडा जाहीर झाल्याने आता इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे.  ८ पर्यंत हरकती; २७ ला अंतिम रचना  जिल्हा परिषद व पं...

दिव्यक्रांतीचा आदर्श समाज भूषण पुरस्कार संगमनेरचे वकील उदयसिंह ढोमसे पाटलांना ...

इमेज
संगमनेर | अनंत पांगारकर पुण्याच्या दिव्य क्रांती सोशल फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा आदर्श समाज भूषण गौरव पुरस्कार संगमनेरमधील वकील आणि बार असोसिएशनचे उपाध्यक्ष उदयसिंह ज. ढोमसे पाटील यांना मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये प्रदान करण्यात आला. फाउंडेशनच्यावतीने यावर्षीच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये संगमनेरमधून ढोमसे पाटील यांचा समावेश होता. पुण्यात आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुर्यादत्ता एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी बेळगाव येथील विक्रम शिंगाडे उपस्थित होते. ढोमसे पाटील हे अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि संघटनांशी संलग्न आहेत. विरंगुळा फाउंडेशनच्या माध्यमातून अनाथ मुले, पीडित महिला यांच्याकरिता त्यांचे विशेष योगदान राहिले आहे. तसेच त्यांचे संगमनेर वकील संघाचे नुकतेच सलग चौथ्यांदा उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. वकील संघाचे उपाध्यक्ष म्हणून काम बघणाऱ्या ढोमसे यांनी या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.कोरोना साथीच्या कालखंडात त्यांनी केलेले...

अहमदनगर-पुणे मार्गावर धावली राज्यातील पह‍िली 'ई-बस'

इमेज
  महामंडळाचे पह‍िले वाहक लक्ष्मणराव केवटे यांच्याहस्ते ह‍िरवा झेंडा संगमनेर  राज्य पर‍िवहन महामंडळाची पह‍िली बस १ जून १९४८ रोजी पुणे-अहमदनगर  मार्गावर धावली होती. त्या इत‍िहासाची १ जून २०२२ रोजी अहमदनगर-पुणे दरम्यान पुनरावृत्ती झाली. अहमदनगर-पुणे दरम्यान 'श‍िवाई' या राज्यातील पह‍िल्या व‍िद्युत घटावरील (ई-बस) सेवेची सुरूवात महाराष्ट्र राज्य पर‍िवहन महामंडळाचे पहिले वाहक अहमदनगर येथील लक्ष्मणराव शंकरराव केवटे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली.  एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवेला ७४ वर्ष पूर्ण झाली आहेत. अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण झाले आहे. एसटीची पहिली बस माळीवाडा येथून पुण्याच्या द‍िशेने धावली होती. श‍िवाई ही 'ई-बस' ही याच मार्गावरून धावणार आहे. आज तारकपूर आगारातून या 'ई-बस' सेवेला सुरूवात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले ,महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त शंकर गोरे ,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार ,निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित ,विभाग नियंत्रक विजय गीते , शिवाई ई -बसचे वाहक जयदेव हेंद्रे व चालक गणेश साबळे आदी उपस्थ‍ित होते. श‍...

सोनिया व राहुल गांधींना ईडीची नोटीस ही लोकशाहीची चिंता वाढवणारी

इमेज
संपूर्ण देशातील जनता सोनियाजी व राहुल गांधी यांच्या पाठीशी केंद्रीय यंत्रणांचा भाजपकडून अत्यंत गैरवापर -- नामदार थोरात शिर्डी देशात हुकूमशाही व एकाधिकारशाही वाढवणाऱ्या भाजप सरकारने सातत्याने केंद्रीय यंत्रणांचा अत्यंत गैरवापर केला आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या श्रीमती सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांना दिलेली ईडीची नोटीस ही लोकशाहीची चिंता वाढवणारी असून संपूर्ण देशातील जनता व काँग्रेसजन हे गांधी कुटुंबियाच्या यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन विधिमंडळ पक्षनेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. शिर्डी येथे काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिराच्या पत्रकार परिषदेत थोरात बोलत होते. यावेळी समवेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रवक्ते अतुल लोंढे,  डॉ. सचिन सावंत, आशिष दुवा आदी उपस्थित होते. मंत्री थोरात म्हणाले, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना नामोहरम करण्याचे काम भाजप सरकार करत आहे . देशात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करून लोकशाहीवर आघात त्यांनी सुरू केला आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी श्रीमती सोनिया गांधी व राहुल गांधी यांना दिल...

भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने राज्य सरकारच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये लाक्षणिक उपोषण

इमेज
अनंत पांगारकर | संगमनेर   सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुर्तता करून मध्यप्रदेश सरकारने ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण टिकवले परंतु महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुर्तता न करता वेळकाढूपणा करत ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण घालवले . ओबीसी समाजाचा राजकीय घात करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपा ओबीसी मोर्चा , संगमनेरच्यावतीने संगमनेर प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने १३ डिसेंबर २०१९ रोजी राज्य सरकारला ट्रिपल टेस्ट करून इंपेरीकल डेटा न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले होते . त्यासाठी आयोग स्थापन करण्याच्या सुचना न्यायालयाने राज्य सरकारला दिल्या होत्या . परंतु राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यासच उशीर केला आणि आयोगाला निधी उपलब्ध करुन दिला नाही म्हणून महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण न्यायालयाने रद्द केले . मध्यप्रदेश सरकारने न्यायालयाच्या आदेशानुसार ट्रिपल टेस्ट करून इंपेरीकल डेटा न्यायालयात वेळेत सा...