पोस्ट्स

संगमनेरजवळ टेम्पो पलटी, दोघे जखमी

इमेज
  नाशिक-पुणे मार्गावर माहुली घाटातील घटना अनंत पांगारकर | संगमनेर नाशिक-पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील घारगावनजीक माहुली घाटामध्ये मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  अपघातानंतर घटनास्थळी टेंपो पलटी झाल्याने कणसांनी भरलेली पोती महामार्गावर विखुरलेल्या अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यामुळे सकाळी बराच काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. महामार्गावरील अपघातग्रस्त टेम्पो हटविण्याचे काम सुरू होते.    अपघाताबद्दल अधिक माहिती अशी, आयशर टेंम्पोचालक बाबासाहेब तातेराव बोडके आणि अर्जुन युवराज गव्हाणे हे कन्नड येथून १२० मक्याच्या कणसांच्या गोण्या घेऊन संगमनेर मार्गे चाकणला जात होते. शुक्रवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ते पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात आले असता अनपेक्षितरीत्या टेम्पो पलटल्याने त्यातील कणसांच्या गोण्या महामार्गावर विखुरल्या गेल्या. अपघातात टेंम्पोचालक बाबासाहेब तातेराव बोडके आणि अर्जुन युवराज गव्हाणे जखमी झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रशासनाने त्यांना रुग्...

लाच भोवली | तहसीलच्या लिपिकास चार वर्षाचा कारावास

इमेज
  नायब तहसीलदार मात्र निर्दोष मुक्त अनंत पांगारकर, संगमनेर वाळू उचलण्याचा परवाना असतानादेखील ठेकेदाराचे दोन ट्रॅक्टर पकडून कारवाई न करण्यासाठी १६ हजारांची लाच घेणाऱ्या संगमनेरच्या तहसील कार्यालयातील तत्कालीन लिपिकास जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी गुरुवारी (ता. १९) चार वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर या लाचखोरीत सामील असल्याचा आरोप असलेल्या तत्कालीन नायब तहसीलदाराची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली. लाचखोरास शिक्षा होण्याची गेल्या अनेक दिवसातील संगमनेरमधील ही पहिलीच घटना आहे. सुभाष विठ्ठल भारती (रा. पढेगाव, ता. कोपरगाव) असे शिक्षा झालेल्या लिपिकाचे नाव असून ते २०१4 मध्ये संगमनेर तहसील कार्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. तर शितल राजधर सावळे असे निर्दोष मुक्तता झालेल्या आणि लाचखोरीचा आरोप ठेवण्यात आलेल्या नायब तहसीलदाराचे नाव आहे. संगमनेर तालुक्यातील कनोली येथील उत्तम वर्पे यांनी २०१४ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रवरा नदी पात्रातून वाळू उचलण्याचा अधिकृत ठेका मिळविला होता. या परवान्याच्या आधारे ते वाळू वाहतूक करत असताना १३ जून २०१४ रोजी तहसील ...

मतदार यादीत भौगोलिक सलगतेची 'यांची' मागणी

इमेज
  भारतीय जनता पक्षाने  प्रांत अधिकारी मंगरुळे यांना दिले हरकतीचे निवेदन अनंत पांगारकर जानेवारी 2022 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीत भौगोलिक सलगता आणण्याची मागणी संगमनेर भाजपतर्फे निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्याकडे हरकतीद्वारे करण्यात आली आहे.  संगमनेर भाजपतर्फे येथील उपविभागीय अधिकारी मंगरुळे यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात  म्हंटले आहे की, संगमनेर शहरातील मतदारांची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात भौगोलिक असमानता आहे. मतदार यादीचे निरीक्षण केले असता असे दिसून आले की, एकाच गल्लीमध्ये असलेल्या शेजारी-शेजारील घरांमध्ये मतदारांची नावे, पूर्वीच्या मतदार यादीमध्ये अनुक्रमाणे होती परंतु आत्ता प्रसिद्ध झालेल्या प्रारुप मतदार यादीमध्ये शेजारील घरांमध्ये काही पानांचे अंतर आहे. काही ठिकाणी एकाच घरातील सदस्य वेगवेगळ्या पानांवर आहेत असे निदर्शनात आले आहे. त्यामुळे या मतदारासंदर्भात काही वेळा मतदान केंद्रसुद्धा दुसरे असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या सदोष यादीमुळे निवडणुकीतील उमे...

धनादेश न वटल्याने व्यापाऱ्याला सहा महिन्यांची शिक्षा

इमेज
नुकसान भरपाईपोटी 4 लाख 25 हजार रुपये देण्याचे आदेश अनंत पांगारकर | संगमनेर प्लायवूड सनमायकाच्या खरेदी व्यवहारापोटी दिलेला धनादेश वटण्याची हमी देऊनदेखील तो धनादेश न वटता बँकेतून परत आला, या कारणावरून संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीस सहा महिन्यांची कैद ठोठावली आहे. याशिवाय नुकसान भरपाई म्हणून 4 लाख 25 हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. आरोपीने नुकसानभरपाईची रक्कम न दिल्यास आणखी सहा महिने कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विलास लालु कुटे (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) असे आरोपी व्यावसायिकाचे नाव आहे. आरोपी कुटे यांचे सुकेवाडी समनापुर रस्त्यावर साक्षी फर्निचर नावाचे रिटेल फर्निचर व हार्डवेअर विक्रीचे दुकान होते. कुटे यांनी शहरालगतच्या घुलेवाडी गावातील आनंद प्रफुल्ल बोगावत यांच्या शितल फ्लाय अँड हार्डवेअर या दुकानातून प्लायवूड सनमायका आदी मालाची खरेदी केली होती. या व्यवहाराच्या देण्यापोटी आरोपी विलास कुटे यांनी बोगावत यांना 5 डिसेंबर 2015 रोजीचा 3 लाख 70 हजार रुपयांचा संगमनेरच्या कार्पोरेशन बँकेचा धनादेश दिला होता.  हा धनादेश वटण्याची हमीदेखील त्यांनी दिली होती...

विवाहितेच्या खून प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता

इमेज
संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल अनंत पांगारकर | संगमनेर विवाहित महिलेच्या अंगावर कोड असल्याच्या कारणातून केला रॉकेल ओतून पेटवून तिच्या हत्येस कारणीभूत ठरणाऱ्या आरोपींची संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्याकडे संगमनेर तालुक्यातील निमोन येथील जनतेचे लक्ष लागले होते. संगमनेर तालुक्यातील निमोण येथे 9 जुलै 2016 रोजी घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली होती. घटनेतील प्रमुख आरोपी उत्तम मंडलिक याची पत्नी कोमल हिच्या अंगावर कोड असल्याच्या कारणातून पती उत्तम पुंजा मंडलिक याच्यासह विवाहितेचा दीर नवनाथ मंडलिक, जाव शीतल मंडलिक आणि ननंद मीना कैलास चौधरी ज्यांनी विवाहिता कोमल हिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले होते. गंभीर भाजलेल्या कोमल हिचा उपचारादरम्यान नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात 16 जुलैला मृत्यू झाला होता. याप्रकरणी आरोपींच्या विरोधात संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांनी तपास करत संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात चारही आरोपींवि...

धनादेश न वटल्याप्रकरणी श्रीरामपुरच्या व्यापाऱ्यास एक वर्ष कारावासाची शिक्षा

इमेज
  संगमनेरच्या अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकारी  न्यायालयाचा निकाल   अनंत पांगारकर | संगमनेर शेतकऱ्याकडून केलेल्या मका खरेदीपोटी दिलेला धनादेश न वटल्याने येथील अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकाऱ्यांनी श्रीरामपुरच्या व्यापाऱ्यास एक वर्ष कारावासाची शिक्षा व महिनाभराच्या आत तक्रारदाराला ४ लाख ६१ हजार ७०० रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहे. उदयकुमार रविंद्रकुमार कटारिया (रा. श्रीरामपुर) असे संबधीत व्यापाऱ्याचे नांव आहे.  संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला येथील शेतकरी नानासाहेब मनोहर वारुंक्षे यांनी श्रीरामपुर येथील उदय ट्रेडींग कंपनीचे उदयकुमार रविंद्रकुमार कटारिया यांच्याशी २०१७ मध्ये मका विक्रीसंदर्भात व्यवहार केला होता. वारुंक्षे यांच्याकडून कटारीया यांनी मका खरेदी करत मक्याच्या खरेदी व्यवहारापोटी वारुंक्षे यांना ४ लाख ६१ हजार ७०० रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र कटारिया यांच्या बॅक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने त्यांनी दिलेला धनादेश बॅकेतून न वटता परत आला. त्यामुळे वारुंक्षे यांनी कटारिया यांच्याकडे रकमेची वारंवार मागणी केली. मात्र कटारिया यांनी धनादेशाची रक्कम अदा न केल्याने ...

संगमनेर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारीपदी सुवर्णा फटांगरे

इमेज
लोक सहभागातून जिल्हा परिषदेच्या शाळा विकसित व्हाव्यात - गटविकास अधिकारी अनिल नागने  अनंत पांगारकर | संगमनेर विद्यार्थ्यांना कौशल्ये निर्माण करणारे व आनंददायी शिक्षण देण्याबरोरच जिल्हा परिषदेच्या शाळांना भौतिक सुविधा  निर्माण कराव्या लागतील. प्रशासन, शिक्षक यांच्या समन्वयातून लोकसहभागातून हे कार्य नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे यांच्या प्रशासकीय कौशल्याने शक्य होईल असा आशावाद गटविकास अधिकारी अनिल नागने यांनी व्यक्त केला. संगमनेर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी म्हणून सुवर्णा फटांगरे यांनी सूत्रे स्वीकारली. तालुक्यातील महिला शिक्षिकांच्यावतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानवरून नागणे बोलत होते. याप्रसंगी तालुक्यातील महीला प्राथमिक शिक्षकांच्यावतीने वृषाली कडलग व अंजली मुळे यांनी सुवर्णा फटांगरे यांचा सत्कार केला. व्यासपीठावर अरुण जोर्वेकर, केंद्रप्रमुख शिवनाथ पारधी, अशोक गोसावी, दशरथ धादवड, प्रभाकर रोकडे, विद्या भागवत, अलका साखरे  उपस्थित होते. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात नागणे पुढे म्हणाले की ,  आनंददायी शिक्षण देण्यात जिल्ह...